सचिन वाझेची आणखी एक अलिशान मोटार एनआयएला सापडली

साम टीव्ही ब्युरो
मंगळवार, 30 मार्च 2021

सचिन वाझे  प्रकरणातला मोठा पुरावा असलेली एक आलिशान गाडी पोलिसांना सापडली आहे. नवी मुंबईतल्या वाशी पोलीस ठाण्याच्या हद्दीतुन आऊटलँडर गाडी ताब्यात घेण्यात आली आहे.

मुंबई : सचिन वाझे (Sachin Vaze) प्रकरणातला मोठा पुरावा असलेली एक आलिशान गाडी पोलिसांना सापडली आहे. नवी मुंबईतल्या वाशी पोलीस ठाण्याच्या हद्दीतुन आऊटलँडर गाडी (Outlander car) ताब्यात घेण्यात आली आहे.

ही आऊटलँडर कार कामोठे परिसरातल्या एका सोसायटीमध्ये  पार्क करून ठेवण्यात आली होती. आणि बरेच दिवस कोणतीही व्यक्ती ती गाडी वापरत नाही, अशी माहिती  स्थानिकांनी स्थानिक पोलिसांना (Police)  चौकशी (Investigation)  दरम्यान  दिली. ज्यावरून या गाडीचा दुसरा मालक सचिन वाझे नावाची व्यक्ती असल्याचं स्पष्ट झाल आहे. NIA Found One more Car used By Sachin Waze

आतापर्यंत NIA ला वाझे यांच्याशी संबंधित दोन मर्सिडीज, 1 प्राडो, इनोव्व्हा, स्फोटक सापडलेली स्कॉर्पिओ आणि नुकतीच ताब्यात घेतलेली आऊटलँडर अश्या 6 गाड्या मिळालेल्या आहेत. NIA Found One more Car used By Sachin Waze

NIA अजूनही या 6 गाड्यांच्या व्यतिरिक्त अजून एक आऊटलँडर,ऑडी आणि स्कोडा या गाड्यांच्या शोधात आहे. या प्रकरणाच्या पुढील तपासासाठी NIA चे डीआयजी (DIG) विधी कुमार दिल्लीवरून मुंबईत येणार आहेत. स्फोटके प्रकरण आणि मनसुख हिरेन (Mansukh Hiren) हत्या प्रकरणाची माहिती आणि तपास जाणून घेण्यासाठी आज मुंबईत दाखल होणार असल्याची माहिती येत आहे. सर्व झालेला तपास पाहून आणि गुन्ह्यांचे गांभीर्य लक्षात घेऊन विधी कुमार हे तपास करत असलेल्या अधिकाऱ्यांना पुढील शोध घेण्यासाठी मार्गदर्शन करणार आहेत. 

Edited by- Sanika Gade. 


संबंधित बातम्या

Saam TV Live