उरवडे येथील आग प्रकरणात कंपनी मालक निकुंज शाह यास 13 जून पर्यंत पोलीस कोठडी... 

साम टीव्ही ब्युरो
बुधवार, 9 जून 2021

मुळशी तालुक्यातील उरवडे एमआयडीसीतील एसव्हीएस या रासायनिक कंपनी मध्ये लागलेल्या आगीत १८ कामगाराचे होरपळून मृत्यू झाले. मृत्यांमध्ये १५ महिला कामगारांचा समावेश आहे. कंपनीला लागलेल्या आगीला कंपनी मालक स्वतः जबाबदार असल्याचे पुणे ग्रामीण पोलिसांच्या  तपासात समोर आले आहे.

पुणे : मुळशी Mulshi तालुक्यातील उरवडे Urawade एमआयडीसीतील MIDC एसव्हीएस या रासायनिक कंपनी Company मध्ये लागलेल्या आगीत १८ कामगाराचे होरपळून मृत्यू झाले. मृत्यांमध्ये १५ महिला कामगारांचा समावेश आहे. कंपनीला लागलेल्या आगीला कंपनी मालक स्वतः जबाबदार असल्याचे पुणे Pune ग्रामीण पोलिसांच्या Police तपासात समोर आले आहे. त्यानुसार कंपनी मालक निकुंज शहा यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आले आहे. त्यांना शिवाजीनगर Shivajinagar जिल्हा कोर्टात Court हजर केले असता १३ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. Nikunj Shah owner of company in Urawade fire case has been remanded in police custody till June 13 

कंपनीच्या मालकाचा निष्काळजीपणामुळे ही दुर्घटना घडल्याचे पोलिसांच्या तपासात निदर्शनास आली आहे. या दुर्घटनेची चौकशी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी केली आहे. त्यानंतर कंपनीचे मालक निकुंज शहा यांच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आल आहे. पौड पोलीस ठाण्याते पोलीस निरीक्षक अशोक धुमाळ या प्रकरणाचा पुढील तपास करत असल्याचे देशमुख यांनी सांगितले आहे.

एसव्हीएस कंपनीला लागलेल्या आगीत मृत्यू Dead झालेले कामगारांची ओळख पटवण्यासाठी डीएनए DNA चाचणी करण्यात येणार आहे. मात्र, पोलीस आणि ससून Sasun रुग्णालयाच्या समन्वया अभावी मृतदेह अजून चार दिवस झाल्यानंतर नातेवाईकांकडे सोपवले जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी दिली आहे. डीएनए चाचणीसाठी रक्ताचे नमुने देण्यासाठी आलेल्या नातेवाईकांना प्रचंड मनस्ताप सहन कराव लागत आहे. Nikunj Shah owner of company in Urawade fire case has been remanded in police custody till June 13

बुलेट चोरी करणाऱ्या टोळीच्या हालचाली झाल्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद.. 

मंगळवारी संध्याकाळच्या सुमारास सर्व नातेवाईकांच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले आहे. ते नमुने न्याय वैद्यक प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. डीएनए चाचणीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर शनिवारी रात्री उशिरा किंवा रविवारी सकाळीच्या सुमारास मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिले जाणार आहेत. दरम्यान, या घटनेची प्राथमिक चौकशीचे  अहवाल रात्री उशिरा प्राप्त झाला आहे. या अहवालानुसार कारवाई करण्याच्या सूचना पुणे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिली आहे.

पहा व्हिडिओ 

“पुण्याच्या मुळशी तालुक्यातील उरवडे गावाजवळ रासायनिक कंपनीला लागलेल्या आगीमध्ये कामगारांचा मृत्यू झाल्याची घटना दुर्दैवी, धक्कादायक आहे. अग्निशमन दलाने आग विझवण्यासाठी, बचाव कार्य शर्थीचे प्रयत्न करून सुद्धा काहींना वाचवता आलं नाही, हे अधिक दु:खदायक आहे. दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या कुटुंबाबद्दल सहानुभूती असून, मृतांच्या कुटुंबाना राज्य सरकारकडून प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत देण्यात येईल”,अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.

Edited By- Digambar Jadhav


संबंधित बातम्या

Saam TV Live