कोरोना रुग्णांच्या उपचारांबाबत निलेश लंकेंनी दिली 'ही' माहिती

lanke nilesh
lanke nilesh

पंढरपूर -राज्यातील वाढत्या  कोरोना Corona रूग्ण संख्येमुळे आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण आला आहे. अशा संकट काळात आरोग्य यंत्रणांवर अधिक भार न  देता, समाजातील दानशुर व्यक्तींनी कोविड सेंटर Covid Centre सुरू करून नागरिकांना दिलासा  द्यावा. आंध्र प्रदेशच्या Andra Pradesh धर्तीवर राज्यात देखील कोरोना रूग्णांना मोफत उपचार  करण्याचे राज्य  सरकारचे प्रयत्न सुरू आहेत,  अशी माहिती पारनेरचे राष्ट्रवादीचे NCP आमदार निलेश लंके Nilesh Lanke यांनी आज दिली. Nilesh Lanke gave this information about the treatment of Corona patients

करमाळा Karmala येथे राष्ट्रवादीचे नेते शरद पवार Sharad Pawar यांच्या नावाने सुरू करण्यात आलेल्या 50 बेडच्या कोविड सेंटरचे उदघाटन आज आमदार लंके यांच्या हस्ते करण्यात  आले. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी  वाढत्या कोरोना संसर्गाची चिंता व्यक्त करत उपचारासाठी होणारा खर्च हा सर्वसामान्य रुग्णांच्या आवाक्या बाहेर गेल्याचे स्पष्ट केले.

हे देखील पहा -

आमदार लंके यांनी पारनेर Parner येथे 1100 बेडचे  कोविड सेंटर सुरू केले आहे. त्यांच्या या सामाजिक कार्याची राज्यभरात सध्या चर्चा सुरू आहे. त्यांच्याच  मार्गदर्शनाखाली करमाळा तालुक्यातील पोथरे येथे  राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष संतोष  वारे  यांनी पुढाकार घेवून गरीब व गरजू रूग्णांवर मोफत उपचार करण्यासाठी कोविड सेंटर सुरू केले आहे. Nilesh Lanke gave this information about the treatment of Corona patients

करमाळ्यासह सोलापूर जिल्ह्यात सध्या कोरोना रूग्णांची संख्या  झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे वेळवर  ऑक्सीजन  बेड व रेमडीसेव्हीर इंजेक्सन मिळत नसल्याने रुग्णांचे जीव जात आहेत. येथील तरूणांनी एकत्रित येवून सुरू केलेल्या  कोविड सेंटरचे योगदान मोठे असणार आहे.

कोरोना उपचारासाठी येणारा खर्च हा काही लाखात आहे. त्यामुळे गोरगरीब लोकांचे प्रचंड हाल होत आहेत. अनेक माय माऊली दाग दागिणे विकून उपचारासाठी खर्च करत आहेत. ही परिस्थिती  पाहावत  नाही. यापुढच्या काळात आणखी परिस्थिती बिकट होण्याची भीती आहे. त्यामुळे सर्वांना एकत्र येवून कोरोनाशी लढावे लागणार आहे. कोरोना उपचारासाठी लागणारा खर्च राज्य सरकारने करावा अशी आपण मागणी करणार असल्याचे आमदार लंके यांनी सांगितले.

Edited By - Shivani Tichkule

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com