खेड तालुक्यातील खंडोबाला जाण्यासाठी रोप वे!

साम टिव्ही ब्युरो
शुक्रवार, 23 एप्रिल 2021

खंडोबा मंदिराच्या पायथ्याशी सुसज्ज हेलिपॅड Helipad आणि विश्रामगृह तसेच खंडोबा मंदिर पायथ्याशी रोपवे स्टेशनशेजारी भव्य बगीचा, स्वच्छतागृह, भक्त निवास, मंदिर परिसरामध्ये हायमास्ट लाइट आदी सुविधा करण्यात येणार आहेत असे नितीन गडकरी यांनी सांगितले आहे

नवी दिल्ली : पुणे Pune जिल्ह्यात खेड तालुक्यातील निमगाव NImgaon येथील श्री क्षेत्र खंडोबा Khandoba देवस्थान मंदिरला जोडणारा (धामणटेक ते मंदिर, मंदिर ते निमगाव गावठाण ते दावडी व पुन्हा धामणटेक) रिंगरोड व रोपवे Rope way मार्ग या कामांना केंद्रीय मार्ग निधीतून ५६ कोटी रुपयांची मान्यता देण्यात आली आहे. Nimgaon Khandoba Temple to be Connected by Rope Way Announces Nitin Gadkaray

केंद्री‌य रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी Nitin Gadkary यांनी ट्विटद्वारे ही माहिती दिली आहे. खंडोबा मंदिराच्या पायथ्याशी सुसज्ज हेलिपॅड Helipad आणि विश्रामगृह तसेच खंडोबा मंदिर पायथ्याशी रोपवे स्टेशनशेजारी भव्य बगीचा, स्वच्छतागृह, भक्त निवास, मंदिर परिसरामध्ये हायमास्ट लाइट आदी सुविधा करण्यात येणार आहेत, असे त्यांनी म्हटले आहे. खेडपासून सुमारे दहा किलोमीटर अंतरावर हे मंदीर आहे.

खेड ते मंदिर खरपुडीमार्गे रस्ता व पिंपळगाव ते दावडी मार्गे मंदिर रस्ता हेदेखील होणार आहे. रिंगरोडच्या कामांमुळे खंडोबा देवस्थान हे पुणे-नाशिक व पुणे-नगर या दोन राष्ट्रीय महामार्गांना अत्यंत जवळच्या मार्गाने जोडले जाणार आहे. तसेच भीमाशंकर Bhimashankar, लेण्याद्री, ओझर, रांजणगाव ही अष्टविनायक Ashtavinayak व ज्योतिर्लिंग क्षेत्रे व यमाई देवस्थान, कनेरसर खंडोबा देवस्थानाशी जवळच्या अंतराने जोडली जाणार आहेत. Nimgaon Khandoba Temple to be Connected by Rope Way Announces Nitin Gadkaray

दिव्यांगांना खंडोबा दर्शन
प्रस्तावित रोप-वेमुळे वयस्कर आणि दिव्यांग लोकांना खंडोबा देवस्थान देवदर्शन सहज शक्य होणार आहे. या कामांमुळे खेड तालुक्यातील पर्यटन, औद्योगिक व कृषी क्षेत्रांच्या विकासास मोठ्या प्रमाणावर चालना मिळणार आहे, असा विश्वास नितीन गडकरी यांनी व्यक्त केला आहे.

देवस्थानची वैशिष्ट्ये
चैत्र पौर्णिमा, माघ पौर्णिमा, चंपाषष्टी, दसरा, सोमवती अमावस्येला येथे यात्रा उत्सव असतात. यात्रेच्या वेळी पारंपरिक घाटामधून पळविलेले मानाचे बैल गाडे हे येथील विशेष आकर्षण असते. Nimgaon Khandoba Temple to be Connected by Rope Way Announces Nitin Gadkaray

नितीन गडकरी यांनी दिलेल्या निधीमुळे खेड तालुक्याच्या पूर्व पट्ट्याच्या विकासाला हातभार लागेल. रस्ते चांगले झाल्याने दळणवळण वाढून त्याचा फायदा परिसरातील शेतकऱ्यांनाही होईल. या निधीमुळे मंदिराचा विकास करता येईल. वर्षभरात २५ लाख भाविक मंदिरात येतात. मंदीर परिसरात आता सुमारे ५० एकर क्षेत्र तिथे आहे. या निधीतून तेथे भाविकांना चांगल्या सुविधा देता येईल.
- अमर शिंदे पाटील (माजी सरपंच, श्री क्षेत्र निमगाव)

खंडोबाचे हे मोठे क्षेत्र आहे. त्याचा विकास अपेक्षित असा झाला नाही. आता मंदीर परिसराच्या विकासाठी या निधीचा खूप उपयोग होणार आहे. मंदिरच्या शेजारी मोठी औद्योगिक वसाहत उभी आहे, त्याला चांगला फायदा होईल. माझ्या तालुक्यात पहिला रोप वे, तसेच तीर्थस्थळाबरोबर एक प्रेक्षणीय स्थळ या निमित्ताने उभे राहणार आहे. खऱ्या अर्थाने आम्हाला खंडोबा पावला आहे.
- दिलीप मोहिते (आमदार, खेड)

Edited By - Amit Golwalkar
 


संबंधित बातम्या

Saam TV Live