बापरे- उस्मानाबादमध्ये एका दिवशी १९ जणांवर अंत्यसंस्कार; आठ मृतदेह वेटिंगवर

Crematorium
Crematorium

उस्मानाबाद : शहरात Osmanabad कोरोनाचे रुग्ण वाढत असून एका दिवसात चक्क १९ मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याची वेळी नगरपालिकेवर आली. तरीही आठ मृतदेह वेटिंगवर आहेत. त्यांच्यावर आज अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. Ninteen Cremations in Single Day at Osmanabad

उस्मानाबाद मधील कपिलधारा स्मशानभूमीमध्ये एकुण  १९ जणांवर उस्मानाबादेत एकाचवेळी अंत्यसंस्कार करण्यात आले तर 8 मृतदेह जागा नसल्याने अंत्यसंस्कारसाठी प्रलंबीत ठेवण्यात आले आहेत.आज  त्यांच्यावर  अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. उस्मानाबादच्या स्मशानभूमीतील हे  चित्र मन हेलावून टाकणारे आहे. दरम्यान उस्मानाबाद

जिल्ह्यात कोरोनाचा Coroan कहर झाला असून बेड, रेमडीसीवीर Remedisivir इंजेक्शन, ऑक्सिजन Oxygen साठा संपत आला आहे.कोरोनामुळे  आजवर जिल्ह्यात ६४३ मृत्यू झाले आहेत. तर ४ हजार ९४० ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. Ninteen Cremations in Single Day at Osmanabad

दरम्यान, सोलापुरात दिवसागणिक कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे.राज्य सरकारने आजपासून  कोरोनाच्या संदर्भात कडक संचारबंदी जाहीर केलीय,कडक निर्बंध लावण्यात आले मात्र सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये या निर्णयाची अमलबजावणी होताना दिसत नाहीये,सोशल डिस्टन्सचा पुरता फज्जा उडाल्याचे चित्र याठिकाणी पहायला मिळतं आहे.

Edited By - Amit Golwalkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com