शाब्बास...कोरोनाला भंडारा जिल्ह्यातील 90 गावांनी वेशीवरच रोखले !...

अभिजित घोरमारे
शुक्रवार, 7 मे 2021

पार्श्वभूमीवर  भंडारा जिल्ह्यात कोरोनाचा दररोज विस्फोट होत असला तरी भंडारा जिल्ह्यातील 1029 गावांपैकी 90 गावांनी कोरोना विषाणूच्या संसर्गाला वेशीवरच रोखून धरले आहे. भंडारा जिल्हा प्रशासनाच्या यंत्रणेला प्रतिसाद देत ग्रामस्थांनी नियमांचे पालन केल्यामुळे हे शक्य झाल्याचे दिसून येत आहे.

भंडारा : शाब्बास भंडाराकऱ्यांनो Bhandara करून दाखविले!!!कोरोनाला भंडारा जिल्ह्यातील 90 गावांनी वेशीवरच रोखले! होय,,,है खरे आहे. "गाव तसं चांगलं मात्र समस्यांनी  टांगलं," असं बोलले जाते. परंतु समस्येविरोधात गावकरी ऐकत्र आले की, कोणत्याही समस्येवर मात करता येते. Ninty Villages in Bhandara restricted Corona Spread 

त्याच पार्श्वभूमीवर  भंडारा जिल्ह्यात कोरोनाचा Corona दररोज विस्फोट होत असला तरी भंडारा जिल्ह्यातील 1029 गावांपैकी 90 गावांनी कोरोना विषाणूच्या Virus संसर्गाला वेशीवरच रोखून धरले आहे. भंडारा जिल्हा प्रशासनाच्या यंत्रणेला प्रतिसाद देत ग्रामस्थांनी नियमांचे पालन केल्यामुळे हे शक्य झाल्याचे दिसून येत आहे. 

भंडारा जिल्ह्यातील शहरी भागात मोठ्याप्रमाणात कोरोनाची रूग्णसंख्या आहे, या ग्रामीण भागातील 90 गावांनी बाहेरून येणाऱ्या  प्रत्येक प्रवाशांना घरिच क्वारंटाईन करून आरोग्य तपासणीची मोेहीम कडकपणे राबविण्यात आल्यामुळे ही गावे कोरोनामुक्त राहिली आहेत.

हे देखिल पहा - 

15 एप्रिल पासून लॉकडाऊन झाल्यापासून भंडारा जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सतर्क व ग्रामस्थांच्या प्रयत्नामुळे हे शक्य झाले आहे. लॉकडाऊननंतर Lock Down कामानिमित्त बाहेरगावी गेलेले अनेक ग्रामस्थ परतले, पण ग्रामस्थांनी त्यांना वेशीवर रोखून धरले, 14 दिवस त्यांच्या घरातच क्वारंटाईन होऊन आरोग्य तपासणी करत देखरेख ठेवली। गावात यामुळे कोरोना विषाणूला दूर ठेवता आले आहे.Ninty Villages in Bhandara restricted Corona Spread 

कोरोना रुग्णांसाठी देवदूत ठरतोय पंढरपूरचा औषध विक्रेता

ग्रामस्थांनी कोरोना नियमांचे काटेकोर पालन सुरू केले आहे. फिजिकल डिस्टन्स Physical Distancing, मास्कचा Face Mask वापर, गरज असेल त्यावेळीच अत्यावश्यक वस्तूंच्या खरेदीला बाहेर पडणे, सॅनिटायझर व हात धुण्यासाठी साबणाचा वापर केला जात आहे. प्रवास टाळणे व संसर्गबाधित गाव व शहराकडे न जाण्याबाबत जनजागृती करण्यात येत आहे.

तर अनेक गावांनी आपले सील करून गावाच्या सीमेवर नागरीकांनी खडा पहारा सुरू केला आहे. तर ग्रामपंचायतच्या वतीने गावामध्ये कोरोनाच्या पाश्वभूमिवर निर्जंतुकीकरणासाठी औषधाची फवारणी करण्यात आली आहे. माझं गांव माझी जबाबदारी म्हणून कोरोनाला गावातुन हद्दपार ठेवण्यासाठी माझं गांव माझी जबाबदारी म्हणून कोरोनाला गावाच्या वेशीवर ठेवण्यासाठी 90 गावातील ग्रामस्थांचा सुध्दा मोठा प्रतिसाद मिळत आहे. Ninty Villages in Bhandara restricted Corona Spread 

शहरी भागात कोरोनाचा उद्रेक झाला असून दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढायला लागली आहे. शहरात जसजशी रुग्ण संख्या वाढते आहे, तशी गावात भीती पसरायला लागली आहे, शहरात नागरिकांनी लॉकडाऊनचे नियम पाळावे म्हणून पोलिस कडक पावले उचलत आहेत, गावात मात्र गावक-यांनीच कडक निर्बंध लावले आहेत,त्यामुळे भंडारा जिल्ह्यातील 90 गावात कोरोनाने शिरकाव केला नाही.


संबंधित बातम्या

Saam TV Live