सुखद...... ९० वर्षीय आजोबांनी सलग दोन वेळा कोरोनाला लोळवलं..!

विनोद जिरे
शनिवार, 24 एप्रिल 2021

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत राज्यात थैमान घातल आहे. दररोज हजारो मृत्यू होत असल्याने चिंता व्यक्त केली जातेय. असं असताना बीडमधून एक सुखद बातमी येतेय. बीडच्या अडस इथल्या एका ९० वर्षीय आजोबांनी दोन वेळा कोरोनावर मात केली आहे

बीड : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत राज्यात थैमान घातल आहे. दररोज हजारो मृत्यू होत असल्याने चिंता व्यक्त केली जातेय. असं असताना बीडमधून एक सुखद बातमी येतेय. बीडच्या अडस इथल्या एका ९० वर्षीय आजोबांनी दोन वेळा कोरोनावर मात केली आहे. Ninty Year Old citizen from Beed conquered cororna Twice

बीड Beed जिल्ह्यातल्या आडस या गावातील पांडुरंग आत्माराम आगलावे या ९० वर्षीय आजोबांनी कोरोनाला एकदा नव्हे तर दोनदा लोळवलं आहे. १३ नोव्हेंबर २०२० मधल्या पहिल्या लाटेत आगलावे यांना कोरोनाने Corona पहिल्यांदा गाठलं, त्यातून सुखरूप बाहेर  पडल्यानंतर पुन्हा दुसऱ्या लाटेत देखील आगलावे कोरोना बाधित झाले. मात्र यावेळी देखील ते डगमगले नाही.

कोरोनाने सध्या सर्वत्र हाहाकार माजविला असताना दररोज हजारो बाधित आणि मृत्यू होत असलेल्या आकडेवारीने लोकांमध्ये भीती पसरलीय. मात्र आडस इथल्या आजोबांची जिद्द नक्कीच इतरांसाठी प्रेरणादायी म्हणावी लागेल.

Edited By - Amit Golwalkar


संबंधित बातम्या

Saam TV Live