निरंजनी आखाडा कुंभमेळ्यातून बाहेर !!

Kumbh Mela
Kumbh Mela

हरिद्वार: कुंभमेळ्यात Kumbh Mela कोरोनाची Corona साथ वेगाने पसरत असून महानिर्वाणी आघाड्याचे महामंडलेश्‍वर कपिल देव यांचे कोरोनामुळे काल निधन झाले. तसेच मेळ्यात सहभागी झालेल्या प्रमुख ६८ संतांना Sants कोरोनाचा संसर्ग झाला आहे.  

ही बाधितांची संख्या वाढत असल्याने नागा संन्याशींच्या Naga Sadhu मोठ्या आखाड्यांपैकी एक निरंजनी Niranjani आखाड्याने कुंभमेळातून बाहेर पडण्याची घोषणा शुक्रवारी केली. Niranjani Akhada gets out from Kumbh Mela

निरंजनी आखाड्याचे चिटणीस महंत रवींद्र पुरी म्हणाले की, हरिद्वार शिबिरातील अनेक संत आणि त्यांच्या अनुयायांना कोरोनासदृश लक्षणे दिसत आहेत. त्यामुळे आमच्या आखाड्याच्या संतांनी शनिवारी (ता. १७) कुंभमेळ्याची सांगता करण्याचा निर्णय घेतला आहे.

पाच दिवसांत ७४५ जण पॉझिटिव्ह :
हरिद्वार महाकुंभ सुरू झाल्यापासून सुमारे ७० ज्येष्ठ साधू कोरोना पॉझिटिव्ह Corona Positive झाले आहे. ही संख्या वाढतच चालली आहे. मेळा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी (ता. १५) ३३२ जणांना संसर्ग झाल्याचे आढळले. कुंभमेळ्यात सहभागी झाल्यानंतर कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांची कोणतीही नोंद प्रशासनाकडे नाही. बुधवारी (ता.१४) १३ हजार ४१५ जणांची चाचणी करण्यात आली. त्यापैकी ११९ पॉझिटिव्ह होते. सोमवार (ता.१२)पासून आतापर्यंत झालेल्या ७९ हजार ३०१ चाचण्यांपैकी ७४५ जण पॉझिटिव्ह आढळले आहेत.

देव यांच्या छावणीचे निर्जंतुकीकरण :
आरोग्य विभागाचे महासंचालक डॉ. त्रिपाठी बहुगुणा म्हणाले की, "महामंडलेश्‍वर कपिल देव यांना ज्या रुग्णालयात दाखल केले होते, त्यांनी दिलेल्या माहितीनुसार कोरोनाच्या संसर्गापूर्वी त्यांना मूत्रपिंडाचा आजार होता. त्यांना डायलिसिसही करावे लागत होते. कोरोनामुळे त्यांचा मंगळवारी (ता. १३) मृत्यू झाला". देव आणि अन्य दहा हजारांपेक्षा जास्त संत व त्यांच्या अनुनयांचे वास्तव्य असलेल्या कंखाल या भागाचे निर्जंतुकीकरण करणार आहेत. तेथे राहणाऱ्या सर्वांचे नमुने घेणार असल्याचे हरिद्वारचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. एस. के. झा यांनी सांगितले. दरम्यान कुंभमेळ्यात बंदोबस्तासाठी असलेले ३३ कोरोनाबाधित पोलिसही परतीच्या मार्गावर आहेत. या सर्वांनी लशीचे दोन्ही डोस घेतल्याचे सांगण्यात आले.


महाकुंभच्या सांगतेविषयी लवकरच निर्णय :
देशातील सर्व १३ आखाड्यांचा समावेश असलेल्या आखाडा परिषदेचे सरचिटणीस महंत हरि गिरी म्हणाले की, कुंभमेळ्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे, हे खरे आहे. या स्थितीबाबत आम्ही सर्व आखाड्यांच्या प्रतिनिधीशींची चर्चा करीत आहोत. महाकुंभाच्या सांगतेबद्दल लवकरच निर्णय घेतला जाईल. कुंभमेळा येत्या ३० रोजी अधिकृतपणे समाप्त होणार आहे. चौथे शाही स्नान हे येत्या २७ रोजी होणार आहे. यात सहभागी होण्याचे नियोजन आखाडा परिषद करीत आहे. पण काही निवडक संतांनाच गंगेत स्नान करण्यास परवानगी देण्यात येणार आहे. Niranjani Akhada gets out from Kumbh Mela

निरंजनी आखाड्याला हजारो वर्षांचा इतिहास :
नागा संन्याशींची संख्या लक्षात घेता निरंजनी आखाडा देशातील १३ सर्वांत मोठ्या मुख्य आखाड्यांपैकी एक आहे. जुना आखाड्यानंतर हा आखाडा जास्त प्रभावशाली बलाढ्य मानला जातो. या आखाड्याची स्थापना सन ९०४ मध्ये विक्रम संवत ९६० कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षात झाली होती. गुजरातमधील मांडवी येथे आखाड्याचे मूळ स्थान आहे. महंत अजि गिरी, मौनी सरजूनाथ गिरी, पुरुषोत्तम गिरी, हरिशंकर गिरी, रणछोड भारती, जगजीवन भारती, अर्जुन भारती, जगन्नाथ पुरी, स्वभाव पुरी, कैलाश पुरी, खड्ग नारायण पुरी, स्वभाव पुरी हे निरंजनी आघाड्याचे शिल्पकार आहेत.

प्रयागमध्ये मुख्यालय :
आखाड्याचे आचार्य पीठीधीश्‍वर स्वामी पुण्यानंद गिरी महाराज हे आहेत. मुख्यालय प्रयागमध्ये आहे. उज्जैन, हरिद्वार, त्र्यंबकेश्‍वर आणि उदयपूरमध्ये आखाड्याचे आश्रम आहेत. आखाड्याचे इष्टदेव कार्तिक स्वामी असून धर्मध्वजाचा रंग पिवळसर तपकिरी आहे.

Edited By- Sanika Gade

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com