दादा नेतेगिरी कामात दाखवा; निलेश राणेंचा अजित पवारांना सल्ला

Ajit Pawar- Nilesh Rane
Ajit Pawar- Nilesh Rane

मुंबई :  अजित पवार Ajit Pawar आपण रोज उठून लॉकडाऊनची धमकी देता पण पुण्याचे आपण पालकमंत्री आहात तिथे परिस्थिती सर्वात गंभीर आहे, पुण्यात Pune कोण तुमचं ऐकत नाही आणि धमकी तुम्ही महाराष्ट्राला देता. नेतेगिरी कामात दाखवा साहेब, लोकांचे जीव वाचतील, लॉकडाऊन Lock Down हा फक्त एक पर्याय आहे, उपाय नाही, असे सांगत भाजपचे नेते व माजी खासदार निलेश राणे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर ट्वीटरद्वारे निशाणा साधला आहे. Nitesh Rane Criticism on Ajit Pawar over Lock Down Warning

राज्यात कोरोनाचा कहर वाढला आहे. काल एका दिवसात सुमारे ६४ हजार रुग्ण राज्यात वाढले आहेत. एकीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी १५ एप्रीलपासून राज्यात संचारबंदी जाहीर केली आहे. मात्र, नागरिक ऐकायला तयार नाहीत. वेगवेगळ्या कारणांसाठी नागरिक रस्त्यावर येतच आहेत. त्या  पार्श्वभूमीवर येत्या काही दिवसांत गेल्या वर्षीप्रमाणे कडक लाॅकडाऊन लावावा लागेल, असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल दिला. लोक निर्बंधांचे नीट पालन करत नाहीत, असे आमच्या मंत्रीमंडळातील काही मंत्र्यांनी आम्हाला सांगितले आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत कडक लाॅकडाऊन लावण्याची वेळ येऊ शकते, असेही अजित पवार काल म्हणाले. 

त्यावर दोन ट्वीट करत निलेश राणे Nilesh Rane यांनी अजित पवार यांच्यावर टीका केली. ''अजित पवार काही लाज शिल्लक आहे की नाही तुमच्यात... धमकी द्यायची नाही लोकांना, आता लोकं ऐकायच्या मनःस्थितीत नाही, राज्य सरकारने वाट लावली महाराष्ट्राची. तुम्ही आरोग्य व्यवस्था अगोदर नीट करा मग लॉकडाऊनची धमकी द्या,'' असे राणे यांनी दुसऱ्या ट्वीटमध्ये म्हटले आहे.
Edited By - Amit Golwalkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com