तुम्हीच मीटर रिडींग घ्या आणि वीज बिल भरा...

साम टीव्ही ब्युरो
गुरुवार, 8 एप्रिल 2021

उर्जामंत्री नितीन राऊत यांनी राज्यातील नागरिकांना वीज वापराचं मीटर रिडींग मोबाईल अपद्वारे घ्या आणि वीजबिल भरा असं आवाहन केलं आहे.

मुंबई: वीज बिलाचा (Electricity Bill) मुद्दा गेल्या वर्षभरापासून जोरदार विजेचा झटका देत आहे. वर्षभरापासून विजेच्या घोटाळ्याची जनता रस्त्यावर आंदोलने, घोषणाबाजी करत आहे.  वापरापेक्षा जास्त वीजबिल येत असल्यामुळे महावितरणाकडे सामान्य जनता उत्तर मागत आहे.  या सर्वात आता  राज्याचे उर्जामंत्री नितीन राऊत यांनी राज्यातील जनतेला थेट एक जोरदार आवाहन केलं आहे. Nitin Rout says take electricity meter reading by yourself 

उर्जामंत्री (Minister of Energy) नितीन राऊत (Nitin rout) यांनी राज्यातील नागरिकांना वीज वापराचं मीटर रिडींग (Meter reading) मोबाईल अॅपद्वारे घ्या आणि वीजबिल भरा असं आवाहन केलं आहे. 'ब्रेक दि चेन'च्या निर्बंधांमुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या ग्राहकाचे प्रत्यक्ष वीज वापराचे रिडींग घेण्यात वीज कर्मचाऱ्यांना मनाई आहे.  याच पार्श्वभूमीवर नितीन राऊत यांनी हे आवाहन केलं आहे.

तसंच महावितरणनंही वीज ग्राहकांच्या तक्रारी तातडीनं सोडवण्यात प्रयत्न करावे, त्यांना कोणतीही प्रकारची गैरसोय होऊ नये. यासाठीची विशेष खबरदारी घेण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत.

Edited by- Sanika Gade. 
 


संबंधित बातम्या

Saam TV Live