नितीशकुमारच बिहारचे मुख्यमंत्री होणार! राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्यानेतेपदी निवड

साम टीव्ही
रविवार, 15 नोव्हेंबर 2020

नितीशकुमारच बिहारचे मुख्यमंत्री होणार आहेत. जेडीयूचे नेते नितीश कुमार यांची राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्यानेतेपदी निवड करण्यात आलीय. यासोबतच नितीश कुमार पुन्हा एकदा बिहारचे मुख्यमंत्री होण्यावर शिक्कामोर्तब झालंय.

नितीशकुमारच बिहारचे मुख्यमंत्री होणार आहेत. जेडीयूचे नेते नितीश कुमार यांची राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्यानेतेपदी निवड करण्यात आलीय. यासोबतच नितीश कुमार पुन्हा एकदा बिहारचे मुख्यमंत्री होण्यावर शिक्कामोर्तब झालंय. सोमवारी सकाळी ११.३० वाजता शपथविधी पार पडणार असून यावेळी नितीश कुमार मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील. नितीश कुमार सातव्यांदा आणि सलग चौथ्यांदा मुख्यमंत्रीपदाचा कार्यभार सांभाळणार आहेत. एनडीएची बैठक आज पार पडली.

त्यानंतर नितीश कुमार यांची नेतेपदी निवड करण्याचा निर्णय घेण्यात आला.बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर मुख्यमंत्रीपदावरुन अनेक तर्क-वितर्क लढवले जात होते. भाजपाला जास्त जागा मिळाल्याने नितीश कुमार यांच्या हातातून मुख्यमंत्रीपद निसटणार असल्याची शक्यताही वर्तवली जात होती. पण अखेर एनडीएच्या बैठकीत नितीश कुमार यांची नेतेपदी निवड करत चर्चांना पूर्णविराम देण्यात आलाय. 

राज्यात राष्ट्रीय जनता दल 75 जागा मिळवून सर्वांत मोठा पक्ष ठरला आहे. दुसऱ्या क्रमांका वर 74 जागांसह भाजप आहे. जेडीयूला 43 जागा मिळाल्या असून, काँग्रेसला 19 जागा आहेत. चिराग पासवान यांच्या लोक जनशक्ती पक्षाला केवळ एकाच जागेवर समाधान मानावे लागले आहे. नितीश यांच्या जेडीयूला कमी जागा मिळाल्याने ते पुन्हा मुख्यमंत्री होणार का अशी चर्चा सुरू झाली होती. आता अखेर भाजपने नितीशकुमार यांचेच नाव पुढे केले आहे. 

सत्ता स्थापनेची चर्चा करण्यासाठी एनडीएची बैठक आज झाली. या बैठकीत मुख्यमंत्रिपदी नितीशकुमार यांचे नाव निश्चित करण्यासाठी आले. मागील आठवड्यात नितीशकुमार यांनी मुख्यमंत्रिपदाचा चेंडू एनडीएच्या कोर्टात फेकला होता. मुख्यमंत्री कोण होईल, हे एनडीए ठरवेल, असे नितीशकुमार म्हणाले होते. आज भाजपच्या आणि जेडीयूच्या ज्येष्ठ नेत्यांसमवेत झालेल्या एनडीएच्या बैठकीत नितीशकुमारांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. नितीशकुमार हे चौथ्यांदा बिहारचे मुख्यमंत्री होत आहे. त्यांचा शपथविधी उद्या होण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

बिहारचे उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी, भाजपचे प्रदेशाध्यक्ष संजय जयस्वाल यांनी नितीशकुमार हेच मुख्यमंत्री राहतील, असे आधी स्पष्ट केले होते. भाजप आणि जेडीयूच्या जागांमधील फरकाचा कोणताही परिणाम राज्यातील सत्तासमीकरणावर झालेला सध्या तरी दिसत नाही. 


संबंधित बातम्या

Saam TV Live