परमबीर सिंग यांना अटकेपासून ९ जून पर्यंत दिलासा

सूरज सावंत
सोमवार, 24 मे 2021

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांना अॅट्राॅसिटीच्या प्रकरणात येत्या नऊ जून पर्यंत अटक केली जाणार नाही, अशी ग्वाही आज राज्य सरकारच्या वतीनं उच्च न्यायालयात दिली आहे

मुंबई : मुंबईचे Mumbai माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग Parambir Singh यांना अॅट्राॅसिटीच्या Attrocity प्रकरणात येत्या नऊ जून पर्यंत अटक केली जाणार नाही, अशी ग्वाही आज राज्य सरकारच्या Maharashtra वतीनं उच्च न्यायालयात High Court दिली आहे. तोपर्यंत परमबीर सिंग यांनी तपास यंत्रणेला पूर्ण सहाय्य करावं, अशी विनंती राज्य सरकारनं उच्च न्यायालयाला दिली. No Arrest of Parambir Singh Till 9th June High Court tells Maharashtra Govenrment

पोलिस Police निरीक्षक घाडगे यांनी  परमबीरसिंग यांच्याविरोधात अॅट्रोसिटिचा गुन्हा दाखल केला आहे. परमबीरसिंग ठाण्याचे पोलिस आयुक्त असताना घाडगे तेथे पोलिस निरीक्षक होते. परमबीरसिंग यांचे चुकीचे आदेश न ऐकल्याने माझ्याविरोधात त्यांनी कुभांड रचल्याची तक्रार घाडगे यांनी केली आहे.

हे देखिल पहा

तसेच परमबीरसिंग यांच्या वर्तणुकीबद्दल आणि त्यांच्या संपत्तीबद्दलही मोठे आरोप घाडगे यांनी केले आहेत. त्यानंतर अकोला येथे त्यांच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल झाला. त्याचा तपास गुन्हे सीआयडीनं सुरू केला आहे.  हा गुन्हा रद्द करावा या मागणीसाठी परमबीरसिंग यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठापुढे याचिका दाखल केली आहे. सुटीच्या काळातील खंडपीठात यावर सुनावणी सुरु आहे.

रामदेव बाबांच्या पतंजलीवरच कोरोनाचा अॅटॅक

२१ तारखेला या प्रकरणाची सुनावणी रात्री बारापर्यंत चालली. त्यानंतर न्यायमूर्तींनी ही सुनावणी पूर्ण होईपर्यंत परमबीर सिंग यांना अटक करु नये, असा आदेश न्यायालयाने दिला होत्या त्यानंतर आज पुन्हा सुनावणी सुरु झाली. त्यावेळी परमबीर सिंग यांना नऊ जूनपर्यंत एट्रॉसिटीच्या प्रकरणात अटक करणार नाही, असे राज्य सरकारच्या वतीनं न्यायालयात सांगण्यात आलं. मात्र तोपर्यंत परमबीर यांनी तपासयंत्रणेला तपासात पूर्ण सहकार्य करावं, अशी विनंती राज्य सरकारनं उच्च न्यायालयात केली. No Arrest of Parambir Singh Till 9th June High Court tells Maharashtra Govenrment

मात्र तोपर्यंत याचिकाकर्त्यांनी सर्वोच्च न्यायालयातून या प्रकरणाशी संबंधित याचिका मागे घ्यावी कारण एका प्रकरणात एकाच वेळी दोन ठिकाणी दाद मागता येणार नाही, असे उच्च न्यायालयानं परमबीर सिंग यांना सांगितले. त्यानुसार परमबीरसिंग यांच्या वतीनं सर्वोच्च न्यायालयातील याचिका मागे घेण्याची तयारी दाखवण्यात आली. आज ही सुनावणी तहकूब करण्यात आली. आता ९ जून रोजी नियमित खंडपीठापुढं या प्रकरणाची सुनावणी सुरु होणार आहे.
Edited By - Amit Golwalkar
 


संबंधित बातम्या

Saam TV Live