महाराष्ट्रात एकाही नागरिकाला नागरिकत्व गमवावं लागणार नाही : अनिल देशमुख

सरकारनामा
गुरुवार, 30 जानेवारी 2020

मुंबई : महाराष्ट्रात एकाही नागरिकाला नागरिकत्व गमवावं लागणार नाही अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज मुंबईत पत्रकारांना दिली. 

भीमा कोरेगाव प्रकरण, सीएए आणि मनसेच्या मोर्चाबाबत त्यांनी माहिती दिली. ते म्हणाले, की कोरेगाव भीमा प्रकरणी माझ्याकडे कोणतंही पत्र आलं नाही पत्र आल्यावर कायदेशीर पावलं उचलू भीमा कोरेगाव प्रकरणात जाणूनबुजुन गोवण्यात आलं आहे का किंवा बाहेर काढण्यात आलं आहे का ? याचीही मी माहिती घेत आहे.

मंत्रिमंडळ बैठकीत याबाबत चर्चा झाली नाही मात्र मुख्यमंत्र्याशी याबाबत चर्चा झाली आहे. मनसेने मोर्चासाठी परवानगी मागितली आहे पोलीस त्याबाबत निर्णय घेतील. 

कोरेगाव-भीमा प्रकरणी आयोगाला ज्यांची गरज आहे त्यांना बोलवू शकते, मग ते देवेंद्र फडणवीस असो किंवा अन्य कोणी, याबाबत आयोग ठरवेल, तो त्यांचा अधिकार असल्याचे ते म्हणाले. 
 
WebTittle :: No citizen will have to lose citizenship in Maharashtra: Anil Deshmukh

संबंधित बातम्या

Saam TV Live