खेड पंचायत समिती सभापती भगवान पोखरकर यांच्या विरुद्धचा अविश्वास ठराव मंजुर

राजगुरूनगर
राजगुरूनगर

खेड : पंचायत समिती सभापती यांच्यावरील अविश्वास ठरावावरुन पंचायत समिती सदस्यांमध्ये हाणामारीचे नाट्य रंगल्यानंतर आज अखेर खेड प्रांताधिकारी विक्रांत चव्हाण यांच्या समोर अविश्वास ठरावावर सुनावणी घेण्यात आली. No-confidence Motion against Khed Panchayat Samiti Chairman Bhagwan Pokharkar approved

यावेळी सभापती भगवान पोखरकर यांच्या विरुद्धचा अविश्वास ठराव मतदान करुन राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस INC, शिवसेना व भाजप BJP असे 11 विरुद्ध 3 मतांनी मंजुर करण्यात आल्याची माहिती प्रांतधिकारी विक्रांत चव्हाण यांनी दिली आहे.  

हे देखील पहा -

कोरोना काळात पुण्यातील डोणजे येथील रिसॉर्टवर शिवसेनेचे 6 व राष्ट्रवादी काँग्रेस 4 व भाजपाचा एक असे 11 पंचायत समिती सदस्य व त्यांच्या कुटुंबियांना वास्तव्यास असताना सभापती भगवान पोखरकर यांनी त्यांच्या सहकार्यासमवेत जाऊन गोळीबार करत हाणामारी केली होती.No-confidence Motion against Khed Panchayat Samiti Chairman Bhagwan Pokharkar approved

या घटनेनंतर हवेली पोलीसांत भगवान पोखरकर यांच्यासह 15 ते 20 जणांवर गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली होती. सभापती भगवान पोखरकर यांच्या विरुद्धच्या अविश्वास ठरावावर आज प्रांताधिकारी विक्रांत चव्हाण यांच्या समोर मतदान झाले.

यावेळी हवेली पोलीसांच्या अटकेत असणारे सभापती भगवान पोखरकर Bhagwan Pokharkar यांना पोलीस बंदोबस्तात खेड पंचायत समिती आवारात आणण्यात आले होते.यावेळी पंचायत समितीसह राजगुरुनगर शहरात पोलीसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. No-confidence Motion against Khed Panchayat Samiti Chairman Bhagwan Pokharkar approved

खेड पंचायत समिती सभापती पदावरुन सुरु झालेल्या वादात शिवसेना Shivsena विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस NCP असा सामना सुरु होऊन माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील Shivaji Adhalrao Patil यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे खेडचे आमदार MLA दिलीप मोहिते Dilip Mohite यांच्यावर वैयक्तिक पातळीवर टिका केली होती.

त्यातच आमदार मोहितेंनी आढळराव पाटलांना लक्ष केले होते. हा शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसचा वाद पक्षश्रेष्ठीपर्यत पोहचला होता. मात्र महाविकास आघाडीत समावेश असणाऱ्या दोन्ही पक्षांनी स्थानिक राजकारण जाहिरपणे कुठलीच ठोस भुमिका घेतली नाही. No-confidence Motion against Khed Panchayat Samiti Chairman Bhagwan Pokharkar approved

खेड Khed पंचायत समितीत Panchayat Samiti सभापती पदावरुन सुरु झालेल्या राजकीय नाट्याने गुन्हेगारीचे रुप धारण केल्याने कायदा व सुव्यवस्था सुरळित ठेवण्यासाठी मागील चार दिवसांपासून राजगुरुनगर Rajgurunagar शहरात पोलिसांसह Police दंगल विरोधी पथकाचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. आज राजगुरुनगर शहरात संचारबंदीचा आदेश लागू करण्यात आला आहे. 

Edited By : krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com