यावर्षी लहा मुलांसाठी कोरोनाची लस नाहीच? लस बनवणाऱ्या कंपनीची धक्कादायक माहिती

साम टीव्ही
गुरुवार, 6 ऑगस्ट 2020
  • यावर्षी लहा मुलांसाठी कोरोनाची लस नाहीच?
  • लस बनवणाऱ्या कंपनीची धक्कादायक माहिती
  • सध्या फक्त प्रौढांवर लसीची चाचणी

कोरोनाच्या लसीची प्रतीक्षा जगभरातल्या प्रत्येकालाच आहे, भारतासह काही देशांमध्ये लसींची अंतिम चाचणी सुरू आहे, मात्र लस आली तरी ती लहान मुलांसाठी नसेल असा धक्कादायक दावा केला गेलाय. तोही लस बनवणाऱ्या प्रमुख कंपनीने.

कोरोनाच्या लसीची प्रतीक्षा संपूर्ण जगालाच आहे. भारतासह जगभरातील अनेक देशांच्या लसींची चाचणी अंतिम टप्प्यात आहे, सर्वात आधी लसीची चाचणी सुरू करणाऱ्या रशियाच्या कंपनीने मात्र धक्कादायक माहिती दिलीय. कोरोनावर येणारी लस यंदा लहान मुलांसाठी नसेल अशी माहिती रशियाच्या द गामाले साइंटिफिक रिसर्च इंस्टीट्यूटने दिलीय.

रशियाच्या द गामाले साइंटिफिक रिसर्च इंस्टीट्यूटकडून लसीची चाचणी सुरू आहे. मात्र कोरोनावरील या लसीची चाचणी सध्या फक्त प्रौढांवरच सुरू आहे. त्यामुळे ही लस आली तर लहान मुलांना त्याचा फायदा होईल का?, याबाबत चित्र स्पष्ट नाही. या लसीची चाचणी लहान मुलांवर स्वतंत्रपणे करण्याची गरज अजून या प्रक्रियेला वेळ लागू शकतो, त्यामुळे तूर्तास यंदा लहान मुलांसाठी लस मिळणार नसल्याचं द गामाले साइंटिफिक रिसर्च इंस्टीट्यूटनं सांगितलंय.

कोरोनाचा धोका लहान मुलं आणि वृद्धांनाच जास्त असल्याचा कयास जागतिक संशोधकांनी आधीच मांडलाय. त्यामुळे लहान मुलांसाठीही लस बनवण्याला प्राधान्य द्यायला हवं. पण, लहान मुलांसाठी लस येईल तेव्हा येईल, तोपर्यंत लहान मुलांसह प्रत्येकानं स्वत:चीही काळजी घ्यायला हवी.


संबंधित बातम्या

Saam TV Live