बहिर्जी नाईक यांची समाधी असलेल्या गावात अद्यापही झाला नाही कोरोनाचा शिरकाव

sangli
sangli

सांगली : शहरी भागातून पसरलेल्या कोरोनाने Corona ग्रामीण भाग देखील व्यापून टाकला आहे. पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेचा मोठा फटका ग्रामीण भागाला बसला असून अनेक गावात रुग्ण Patients मोठ्या संख्येने सापडले आहेत. No Corona Yet In The Village Of Bahirji Naik Samadhi 

मात्र सांगली Sangli जिल्ह्यातील खानापूर Khanapur तालुक्यातील बाणूरगड Banurgad एक गाव Village असे आहे, ज्या गावाने कोरोनाला दोन्ही लाटेत गावात शिरकाव करू दिला नाही.जगात सगळीकडं कोरोनाच्या विषाणूने आणि त्याच्या लाटांनी थैमान घातले आहे.

पहिल्या लाटेपेक्षा दूसरी लाट महाराष्ट्रामध्ये अधिक गंभीर बनली आहे. शहरापाठोपाठ आता गावात देखील कोरोनाचा मोठा प्रसार झाला. कोरोनाचा रुग्ण सापडत नाही अशी गावे हाताच्या बोटावर मोजण्याइतकीच असतील. No Corona Yet In The Village Of Bahirji Naik Samadhi 

सांगली जिल्ह्यात खानापूर तालुक्यातील बाणूरगड या गडाने कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत देखील  कोरोनाचा गावात शिरकाव होऊ दिला नाही. सांगली जिल्ह्यातील खानापूर, आटपाडी आणि सोलापूर जिल्ह्यातील सांगोला या तीन तालुक्यांच्या सीमेवर हे बाणूरगड नावाचं गाव वसलं आहे.

शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात या गावाजवळील बाणूरगड किल्ल्याला मोठं महत्व होतं. शिवाजी महाराजांचे Shivaji Maharaj अत्यंत विश्वासू गुप्तचर बहिर्जी नाईक Bahirji Naik यांची समाधी देखील येथे आहे असे सांगितले जाते. या किल्ल्या शेजारीच हे बाणूरगड गाव आहे. No Corona Yet In The Village Of Bahirji Naik Samadhi 

गेल्या दोन वर्षात कोरोना जगाच्या काना कोपऱ्यात पोहचला. पण, तेराश-साडे तेराशे लोकसंख्येच्या या गावात कोरोनाचा शिरकाव होऊ शकला नाही. हे गाव डोंगराळ भागात आहे म्हणून इथे कोरोना पोहचू शकला नाही असे नाही.

तर या गावाने मास्क, सॅनिटायझर आणि सोशल डिस्टंसिंग या त्रिसुत्रीचा वापर अत्यंत काटेकोरपणे करून अगदी गेल्या वर्षांच्या सुरुवातीपासूनच कोरोनाला प्रवेश करू दिलेला नाही. No Corona Yet In The Village Of Bahirji Naik Samadhi 

ग्रामपंचायती बरोबर आशा वर्कर यांनी देखील सुरुवातीपासूनच कोरोना बाबत सगळ्या गावात योग्य प्रबोधन केले. गेल्यावर्षी सगळीकडे कोरोना महामारीची पहिली लाट आली होती तेंव्हापासून गावात ग्रामपंचायत पदाधिकारी, आरोग्य कर्मचारी, आशा वर्कर यांनी नियमितपणे कोरोना प्रतिबंधक सर्व नियम पाळले आणि गावात बाहेरून येणाऱ्या प्रत्येकास पाळण्यास सक्तीचे केले. 

हे देखील पहा -

तर बाहेरून आलेल्या नागरिकांसाठी 15 दिवस सक्तीच्या क्वारंटाईनची सोय गावात कुणी राहत नसलेल्या घरात केली जात असे. गावात कोणी पाहुणा जरी आला तरी त्याची लगेच कोरोना चाचणी करुन घेतली जाते. No Corona Yet In The Village Of Bahirji Naik Samadhi 

गावातील ४५ आणि ६० वर्षांच्या वरच्या सर्व लोकांचे लसीकरण पूर्ण केले गेले आहे.  जरा जरी शंका आली तरी सबंध गावात सॅनिटायझेशन कार्यक्रम राबवला जातो.

येथील ग्रामस्थ सुद्धा शासनाचे सगळे नियम पाळताना दिसतात. ग्रामदक्षता समिती आणि सगळ्या ग्रामस्थांमुळे आज पर्यंत आम्ही कोरोनाला गावात शिरु दिलेले नाही. यापुढेही हाच निर्धार आहे. असे सांगत कोरोना वेशीवरच थोपवण्याचे श्रेय लोकांना आणि लोकप्रतिनिधींना असे ग्रामस्थ सांगतात. 

Edited By : Krushnarav Sathe 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com