मंत्र्यांच्या बंगल्यांना वीजबिलं पाठवली नाहीत, सामान्यांना एक न्याय मग मत्र्यांना वेगळा न्याय का?

साम टीव्ही
रविवार, 27 सप्टेंबर 2020
  • 15 मंत्र्यांच्या बंगल्यांना वीजबिलं पाठवली नाहीत.
  • बेस्ट उपक्रमाकडून वीजबिलं पाठवलीच नसल्याची बाब उघड
  • RTI मधून उघड झाली महत्त्वपूर्ण माहिती
  • सामान्यांना एक न्याय मग मत्र्यांना वेगळा न्याय का?

लॉकडाऊनच्या काऴात राज्यातील काही मंत्र्यांच्या बंगल्यांना बेस्ट उपक्रमाने वीज बिलं पाठवलीच नसल्याची बाब समोर आलीये. मुंबईत असलेल्या जवळपास 15 मंत्र्यांच्या बंगल्यांना पाच महिन्यांची बिलं बेस्टकडून पाठवण्यात आलेली नाहीयेत. लॉकडाउनमध्ये सर्वसामान्य वीजग्राहकांकडून जादा बिले आकारण्यात आल्याच्या असंख्य तक्रारी समोर आल्या.

अशीच तत्परता मंत्र्यांच्या बंगल्यांबाबत का दाखविण्यात आली नाही असा प्रश्न विचारला जातोय. आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी टाकलेल्या आरटीआयमधून ही माहिती समोर आलीये. 10 मंत्र्यांच्या बंगल्यांची गेल्या चार महिन्यांची बिले अद्यापही मिळालेली नाहीयेत.

पाहा यासंबंधीतील व्हिडिओ -


संबंधित बातम्या

Saam TV Live