मुंबईकरांनो...सावधान! उद्यापासून रस्त्यावर 'नो स्टिकर, नो एंट्री'..(पहा व्हिडिओ)

तुषार रुपनवर
रविवार, 18 एप्रिल 2021

सोमवारपासून मुंबईत प्रत्येक टोल नाक्यांवर शिवाय मुंबईतील विविध भागांमध्ये पोलिस प्रशासन नाकाबंदी करून वाहनांच्या स्टिकरची पाहणी करणार आहे. ज्या गाडीला स्टिकर नसणार त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे स्टिकरचा गैरवापर करणा-या वाहनांवर देखील कारवाई मुंबई पोलिस करणार आहेत. 

मुंबई : देशात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. या लाटेचा सर्वाधिक असा फटका महाराष्ट्र Maharashtra राज्याला बसताना पाहायला मिळत आहे. त्यातची देशाची राजधानी असणा-या मुंबईत Mumbai दुस-या लाटेत कोरोना रूग्ण संख्या दिवसेंदिवस हजारोंच्या संख्येने वाढताना पाहायला मिळत आहे. राज्य शासन आणि पोलिस प्रशासन या दोन्ही यंत्रणा कोरोना साखळी तोडण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करताना पाहायला मिळत आहेत. No Entry on Roads without Stickers in Mumbai From Tomorrow

राज्यात १५ एप्रिल पासून संचारबंदी Curfew करण्यात आली. मात्र, आजही मुंबईत मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीची Traffic Jam समस्या पाहायला मिळत आहे.या वाहतुक कोंडीमुळे रूग्णवाहिका, मेडिकल स्टाफ यांना पोहचण्यास उशीर होताना पाहायला मिळत आहे. त्याचप्रमाणे अनेक नागरीक कामाविना मुंबईत वाहने घेऊन सर्रासपणे फिरताना दिसत आहेत.

मुंबईतील वाहनांची गर्दी रोखण्यासाठी मुंबई पोलिसांनी Mumbai Police एक वेगळी शक्कल लढवली आहे. यामध्ये मुंबईतील वाहनांना स्टिकर लावण्यात येत आहेत. जर वाहनांना स्टिकर नसेल तर त्या वाहन चालकांवर कारवाई करण्यात येणार आहे. No Entry on Roads without Stickers in Mumbai From Tomorrow

सोमवारपासून मुंबईत प्रत्येक टोल नाक्यांवर शिवाय मुंबईतील विविध भागांमध्ये पोलिस प्रशासन नाकाबंदी करून वाहनांच्या स्टिकरची पाहणी करणार आहे. ज्या गाडीला स्टिकर नसणार त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे स्टिकरचा गैरवापर करणा-या वाहनांवर देखील कारवाई मुंबई पोलिस करणार आहेत. 

असे असतील स्टिकर्स

१. लाल रंगांचा स्टिकर  डॅाक्टर, मेडिकल स्टाफ, नर्सेस यांच्यासाठी आहे.

२. हिरव्या रंगांचा स्टिकर  सर्व प्रकारच्या खाण्याच्या गोष्टी,  डेअरी प्रोटक्ट,बेकरी प्रोडक्ट ,फळे, भाज्या वाहतूक, झोमॅटो, स्विगी यासाठी असणार आहे.

३. पिवळ्या रंगांचा स्टिकर हा अत्यावश्यक सेवेतील वाहणासाठी यामध्ये वकिल, शासकीय कर्मचारी आणि पत्रकार यांचा समावेश असणार आहे. 

No Entry on Roads without Stickers in Mumbai From Tomorrow

मुंबईत कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.मात्र दुसरी कडे अनेक नागरीक विनाकारण संचारबंदी असताना नियमांच पालन करताना पाहायला मिळत नाही. त्यामुळे स्टिकरची कल्पना आणलेली आहे. लाल,पिवळा,हिरवा तीन रंगाच्या स्टिकरचा समावेश असणार आहे.ज्या वाहनांवर स्टिकर नाही आणि जे वाहन चालक स्टिकरचा गैरवापर करत आहेत, त्यांच्यावर आम्ही कायदेशीर कारवाई करणार आहोत, असे मुंबई Mumbai पोलिस आयुक्त हेमंत नगराळे Hemant Nagrale यांनी स्पष्ट केले आहे. 

Edited By - Amit Golwalkar


संबंधित बातम्या

Saam TV Live