बुलढाण्यात एकाही शासकीय रुग्णालयाचे नाही फायर ऑडिट

संजय जाधव
शुक्रवार, 23 एप्रिल 2021

रुग्णालय प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे नगर परिषद प्रशासनाने अनेकदा नोटिसेस देऊनही फायर ऑडिट करण्यात आलेले नसल्याच समोर आले आहे. 

बुलढाणा: राज्यात कोरोनामुळे Corona रुग्णालयावर ताण वाढत आहे. जवळपास सर्वच हॉस्पिटल्स आपल्या पूर्ण क्षमतेने सेवा देत आहेत. असे असताना मात्र अनेक ठिकाणी रुग्णालयात आग Fire लागल्याच्या भयंकर घटना घडत आहेत. मात्र रुग्णालय प्रशासनाच्या Hospital Administration निष्काळजीपणामुळे नगर परिषद Municipal Council प्रशासनाने अनेकदा नोटिसेस देऊनही फायर ऑडिट Fire Audit करण्यात आलेले नसल्याचे समोर आले आहे. No fire audit has done of any government hospital in Buldhana

जिल्ह्यात सध्या कोरोनाच्या सात हजाराच्या वर अॅक्टिव रुग्णांवर उपचार सुरु आहेत. अनेक मोठ्या शासकीय रुग्णालयाचे Government Hospital फायर ऑडिट अद्याप झालेले नाही. यात शेगाव Shegaon येथील सईबाई मोटे उपजिल्हा रुग्णालयाला नगर परिषदेने दोन महिन्याआधी नोटिस Notice देऊन सुद्धा या रुग्णालयाचे फायर ऑडिट करण्यात आलेले नाही. तसेच जिल्ह्यातील अनेक शासकीय आणि ख़ाजगी रुग्णालयांचे Private Hospitals  सुद्धा फायर ऑडिट रखडले असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी भूषण अहिरे Bhushan Ahire यांनी दिली आहे.

या बाबतीत जिल्हा शल्य चिकित्सक District Surgeon यांना विचारणा केली असता त्यांनी सर्वच रुग्णालयाचे फायर ऑडिट झाले असल्याचा दावा केला आहे.

Edited By- Sanika Gade


संबंधित बातम्या

Saam TV Live