‘‘राज ठाकरेंना" सभेसाठी मैदाने मिळेनात

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 6 ऑक्टोबर 2019

 

 

शहरातील सर्व विधानसभा मतदारसंघातील अर्जांची छाननी शनिवारी झाली. सोमवारी अर्ज माघारी घेता येणार आहेत. त्यानंतर, खऱ्या अर्थाने निवडणुकीची रणधुमाळी सुरू होणार आहे. पुढील आठवड्यापासून विविध राजकीय पक्षांच्या जाहीर सभांना सुरुवात होणार आहे. रविवारी असदुद्दीन ओवेसी यांची सभा झाल्यावर बुधवारी राज ठाकरे यांच्या सभेचे नियोजन मनसेकडून करण्यात येत आहे. मात्र, ठाकरे यांच्या सभेसाठी मध्य वस्तीतील मैदान उपलब्ध होत नसल्याची तक्रार मनसेने केली आहे. ठाकरे यांच्या सभेसाठी शहराच्या मध्यवस्तीतील शैक्षणिक संस्थांच्या मैदानावर सभा घेण्याची परवानगी मागण्यात आली होती; पण परवानगी नाकारण्यात आली आहे. काही संस्थांनी तुमच्या सभेसाठी जागा देता येणार नाही, असा पवित्रा घेतला आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या सभा येत्या आठवड्यापासून सुरू होणार आहेत. मात्र, या सभा घेण्यासाठी शहराच्या अनेक भागांत मैदानेच उपलब्ध नसल्याचा मुद्दा पुन्हा समोर आला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नऊ ऑक्टोबरच्या सभेसाठी मैदानच मिळत नसल्याने पूर्वीप्रमाणे टिळक चौकातच सभा घेण्याची परवानगी द्यावी, अशी विनंती पोलिस आयुक्तांकडे करण्यात आली आहे.

'शहरातील शैक्षणिक संस्थांवर सध्या सत्ताधारी पक्ष आणि त्याच्याशी संबंधित संघटनांचे वर्चस्व आहे. त्यामुळे इतर राजकीय पक्षांना सभांसाठी मैदानेच मिळत नाहीत', असा आरोप मनसेचे शहराध्यक्ष आणि कसबा पेठेतील उमेदवार अजय शिंदे यांनी केला आहे. शैक्षणिक संस्थांची मैदाने उपलब्ध होत नसल्याची तक्रार निवडणूक आयोग आणि पोलिसांकडे करण्यात आली आहे. कोणतीच मैदाने उपलब्ध होत नसतील, तर पूर्वीप्रमाणे टिळक चौकाची जागा सभेसाठी देण्यात यावी, अशी विनंती मनसेने पोलिस आयुक्तांकडे केली आहे.

Web Title no ground for raj meeting
 


संबंधित बातम्या

Saam TV Live