लगेचच १०० टक्के लॉकडाऊन करण्याचा विषय तूर्त नाही

वैदेही काणेकर
शनिवार, 10 एप्रिल 2021

राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असताना तूर्तास तरी १००  टक्के लाॅकडाऊन करण्याचा विचार नसल्याचे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केले आहे. निर्बंध कडक करणं आणि त्यांची अंमलबजावणी महत्त्वाची आहे, असे त्यांनी सांगितले आहे.

मुंबई : राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असताना तूर्तास तरी १००  टक्के लाॅकडाऊन करण्याचा विचार नसल्याचे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे Rajesh Tope यांनी स्पष्ट केले आहे. निर्बंध कडक करणं आणि त्यांची अंमलबजावणी महत्त्वाची आहे, असे त्यांनी सांगितले आहे. No Immediate Full Lock Down in Maharashtra States Rajesh Tope

राज्यात Maharashtra कोरोनाची Corona स्थिती भयावह होते आहे. त्या पार्श्वभूमीवर आज (शनिवार) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे Uddhav Thackeray यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. त्यात शनिवार-रविवारचा लाॅकडाऊन संपला की पुन्हा आठवडाभर लाॅकडाऊन Lock Down लावण्याचा निर्णय होण्याची शक्यता असल्याची चर्चा आहे

याबाबत बोलताना टोपे म्हणाले, "लाॅकडाऊनच्या नियमांचं उल्लंघन केल्यास पोलीस कारवाई करू शकतात. माझं महाराष्ट्राच्या जनतेला आव्हान आहे,की सरकारला सहकार्य करा.आरोग्य विभागाच्या अंदाजानुसार, ३० एप्रिलपर्यंत राज्यात अक्टिव्ह केसचा आकडा ११ लाखापर्यंत पोहोचेल. यातील २० टक्के लोकांना रुग्णालयात दाखल करावं लागेल असा अंदाज धरला तर, दोन-अडीच लाख लोकांना ऑक्सिजन, आयसीयू सेवा लागतील,''

टोपे पुढे म्हणाले, "वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता, राज्याला दररोज दीड लाख रॅमडेसिव्हिर इंजेक्शनची गरज आहे. दुप्पट इंजेक्शन मिळाली तर लोकांना याचा फायदा होईल. रॅमडेसिव्हिर उत्पादकांनी २० दिवसांचा अवधी मागितला आहे.चार-पाच दिवसांच्या लॉकडाऊनने काही होत नाही. चेन ब्रेक करायची असेल तर १५ दिवस ते २१ दिवसांचा लॉकडाऊन गरजेचा आहे. लॉकडाऊनची परिस्थिती निर्माण होईल तेव्हा मुख्यमंत्री निर्णय घेतील,''

राज्यातली वाढती रुग्णसंख्या आणि कडक निर्बंध लादूनही परिस्थितीत बदल नाही. त्यामुळे कोरोना बाबत करावयाच्या उपाययोजनाबाबत आज पुन्हा चर्चा होणार आहे. त्यामुळे सरकार लॉक डाऊनच्या Lock Down बाबत विचार करत असल्याची चर्चाआहे. उद्या बाळासाहेब थोरात, एकनाथ शिंदे, जयंत पाटील Jayant Patil विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस Devendra Fadanavis, चंद्रकांत पाटील मनसे प्रमुख राज ठाकरे Raj Thackeray या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. No Immediate Full Lock Down in Maharashtra States Rajesh Tope

राज्यात Maharashtra केंद्राकडून पाठविल्या जाणाऱ्या कोरोना लसींच्या डोसेसचा Corona Vaccine तुटवडा असल्याने राज्यात अनेक ठिकाणी कोरोना लसीकरण थांबवावे लागत आहे. एकीकडे राज्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या भयावर प्रमाणात वाढते आहे. कोरोनाचे मृत्यूही वाढत आहेत. कोरोनाच्या उपचारांमध्ये प्रभावी ठरणाऱ्या रेमडिसीवीर Remdesivir इंजेक्शनचा तुटवडाही आहे. त्यातच कोरोना लशींचाही तुडवडा निर्माण झाल्याने सगळीकडे गोंधळाची परिस्थिती आहे. 
Edited By - Amit Golwalkar


संबंधित बातम्या

Saam TV Live