'महाबीज'चा दिलासा - सोयाबीन बियाणांच्या दरात वाढ नाही

Mahabeej to Keep Soyabeen Seed rates like last year
Mahabeej to Keep Soyabeen Seed rates like last year

अकोला :  राज्यातील शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असलेल्या महाबीजने Mahabeej यावर्षी शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे. महाबीजने आपल्या सोयाबीन Soyabean बियाणे दरात वाढ न करता बियाण्यांचे दर कायम ठेवले आहेत. राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे Dada Bhuse यांनी शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण आणि बियाण्यांचे दर न वाढवता बियाणे उपलब्ध करून देण्याचे निर्देश महाबीजला दिले होते. No increase in rate of soyabeen this year by Mahabeej

महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ (महाबीज) दरवर्षी खरीप हंगामासाठी बियाण्याचा सर्वाधिक पुरवठा करीत असते. राज्यात आगामी हंगामासाठी बियाण्याचा लवकरच पुरवठा सुरू होणार आहे. त्यादृष्टीने महाबीजने सोयाबीनसह इतरही बियाण्यांचे दर निश्चित केले आहेत. महाबीजने यावर्षी सोयाबीन बियाणांच्या दरात वाढ केली  नसल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. या वर्षीच्या  बियाण्याच्या दरांकडे राज्यातील शेतकऱ्यांच्या नजरा लागल्या होत्या. दोन दिवसांपूर्वी महाबीजने निर्णय घेत या खरीप हंगामासाठी दर जाहीर केले आहेत. 

हे देखिल पहा-

महाबीजकडून राज्यातील शेतकऱ्यांना Farmers दरवर्षी लाखो क्विंटल सोयाबीन बियाण्याचा पुरवठा केला जातो.  यंदा झालेल्या अतिवृष्टीमुळे  बीजोत्पादन क्षेत्रात नुकसान झाले होते. त्याचा फटका महाबीजलाही बसलेला आहे. त्यामुळे अपेक्षित सोयाबीन मिळू शकलेले नाही. त्यामुळे या हंगामासाठी किती क्विंटल बियाणे महाबीज पुरवेल याबाबत अधिकृत माहिती अद्याप उपलब्ध होऊ शकलेली नाही. यंदा अधिक भार खासगी कंपन्यांच्या बियाण्यावरही राहणार आहे. महाबीजने यंदा दरवाढ टाळल्याने बाजारपेठेत सोयाबीन बियाण्याच्या दरांवर आपोआप नियंत्रण येईल, अशी अपेक्षा व्यक्त होऊ लागली आहे. No increase in rate of soyabeen this year by Mahabeej

राज्यात मध्य प्रदेशातील बियाणे कंपन्यांकडून पुरवठा केला जातो. बाजारपेठेत यंदा सोयाबीनला चांगला भाव मिळालेला आहे. कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण आणि दरात वाढ न करण्याचे निर्देश महाबीजला दिले होते. राज्यामध्ये सोयाबीनचे क्षेत्र ४२ लाख २२ हजार १६५ हेक्टर आहे. त्यासाठी ३१ लाख ६६ हजार क्विंटल सोयाबीन बियाणांची आवश्यकता आहे. सोयाबीन बियाण्यांची कमतरता भासू नये यासाठी राज्यशासनामार्फत शेतकऱ्यांना स्वत:कडील बियाणे वापरण्याबाबत आवाहन केले होते. त्याचा परिणाम म्हणून शेतकऱ्यांकडे स्वत:कडील मोठ्या प्रमाणात बियाण्यांचे नियोजन केले आहे. कृषी विभागाच्या अंदाजानुसार २० लाख क्विंटल बियाणे शेतकऱ्यांकडे उपलब्ध आहे. 

असे असतील महाबीजचे सोयाबीन बियाण्यांचे यावर्षीचे दर-

सोयाबीन जेएस ३३५ (३० किलो) - २२५० रुपये

सोयाबीन जेएस ९३०५, जेएस ९५६० आणि एमएयुएस ७१ (३० कीलो) - २३४० रुपये

सोयाबीन एमएयुएस १५८ आणि डीएस २२८ (३० किलो) - २४६० रुपये 

Edited By - Amit Golwalkar

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com