परराज्यांतील मजूरांशिवाय कोणीही मुंबई, पुण्यातून बाहेर जाऊ शकणार नाही...वाचा सविस्तर माहिती

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 3 मे 2020

मुंबई व #पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण क्षेत्रांतून दुसरीकडे जाऊ इच्छिणाऱ्या वा या क्षेत्रातील शहरात येऊ पाहणाऱ्या नागरिकांसाठी महत्त्वाचा खुलासा

केंद्र सरकारने काल लाॅकडाऊन 14 दिवसांनी वाढविताना काही ठिकाणी अडकलेल्या मजूरांना, स्थलांतरीतांना मूळ गावी जाण्याची ओढ लागली आहे. तरी यातील महत्त्वाची बाब म्हणजे पुणे आणि मुंबई महानगर क्षेत्रातून कोणीही महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांत जाऊ शकणार नाही अथवा येऊपण शकणार नाही. परराज्यांतील मजूर अथवा स्थलांतरीत जाऊ शकतील, असे नमूद कऱण्यात आले आहे.  

या दोन शहरांतच कोरोना रुगणांची संख्या आहे. त्यामुळे ही शहरे कंटेंटमेंट झोनमध्ये आहेत. या झोनमधून कोणालाही बाहेर जाण्यास अथवा येण्यास परवागनी दिलेली नाही. या कंटेटमेंट किंवा रेड झोनमध्ये मालेगाव, नागपूर, औऱंगाबाद, बारामती, सोलापूर या शहरांचाही समावेश आहे.

#मुंबई व #पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण क्षेत्रांतून दुसरीकडे जाऊ इच्छिणाऱ्या वा या क्षेत्रातील शहरात येऊ पाहणाऱ्या नागरिकांसाठी महत्त्वाचा खुलासा
1️⃣ पोलीस आयुक्तालय असलेल्या शहरामध्ये आंतरराज्य, आंतरजिल्हा प्रवासाच्या परवानगीचे अधिकार संबंधित विभागाच्या पोलिस उपायुक्तांना pic.twitter.com/8Q9HNOraPm

— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) May 2, 2020

पुणे आणि मुंबईसाठी महानगर क्षेत्र असा उल्लेख केल्याने पुणे, पिंपरी-चिंचवड यासह पुण्याजवळील इतर तालुक्यांचाही कंटेंटमेंटमध्ये यात समावेश आहे. तसेच मुंबई महानगरात ठाणे, नवी मुंबई आणि अन्य काही शहरांचाही समावेश आहे. याच टप्प्यात मजुरांची आणि स्थलातरीतांची प्रचंड संख्या आहे. केंद्र सरकारने जाण्यास परवानगी दिल्याचे जाहीर झाल्याने अनेकांचा गैरसमज झाला. त्यातून जिल्हाधिकारी कार्यालय, पोलिस स्टेशन येथे मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे. त्यातून सोशल डिस्टन्सिंग पाळले जात नाही. तसेच कायदा व सुव्यवस्थेचाही प्रश्न निर्माण होण्याचा धोका आहे. महाराष्ट्राच्या इतर भागांतून स्पर्धा परीक्षांसाठीच्या तयारीसाठी आलेले हजारो विद्यार्थी पुण्यात आहेत. त्यांनाही जाता येणार नाही. मुंबई आणि पुणे महानगर प्रदेश विकास  प्राधिकरण क्षेत्रांतून  दुसरीकडे जाऊ इच्छिणाऱ्या वा या क्षेत्रातील शहरात येऊ पाहणाऱ्या नागरिकांसाठी महत्त्वाचा खुलासा पोलिसांनी केला आहे. 

त्यानुसार पोलीस आयुक्तालय असलेल्या शहरामध्ये (उदा. औरंगाबाद, नाशिक, अमरावती, सोलापूर नागपूर आदी)  आंतरराज्य किंवा आंतरजिल्हा प्रवासाची  परवानगी देण्याचे अधिकार  संबंधित विभागाच्या पोलिस उपायुक्तांना आहेत.  असे अधिकार असले तरीही मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण व  पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण  क्षेत्रामधील नागरिकांना महाराष्ट्रातील अन्य जिल्ह्यात जाण्यास अथवा त्या जिल्ह्यातून  या प्राधिकरण क्षेत्रात येण्यास  परवानगी नाही. मात्र, या दोन्ही  प्राधिकरण क्षेत्रातून  महाराष्ट्राबाहेर (विशेषत: कामगार, मजुरांना) जाण्याची परवानगी आहे.
  
अशा परवानगीसाठी जवळच्या पोलीस ठाण्यात संपूर्ण माहितीसह मेडिकल प्रमाणपत्रासह अर्ज करता येईल. सर्व पोलिस ठाण्याची माहिती एकत्र करून त्या विभागांच्या पोलीस उपआयुक्तांकडे पाठविली जाईल. अर्जाची छाननी करून नियमानुसार आणि तेथील कोविड-१९ प्रादुर्भाव परिस्थितीचा विचार करून  पुढील कार्यवाही केली जाणार आहे. 

कृपया अर्धवट किंवा अनधिकृत किंवा ऐकीव, सांगोवांगीने दिल्या जाणाऱ्या माहितीवर विश्वास ठेवू नये, कोणीही कुठेही धावाधाव करू नये. राज्य शासनाच्या सर्व निर्देशांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.


संबंधित बातम्या

Saam TV Live