मुंबईत आज लसीकरण बंद; ६० वर्षांवरील नागरिकांना गुरुवारपर्यंत थेट मात्रा

साम टिव्ही ब्युरो
सोमवार, 17 मे 2021

गेल्या आठवड्यात पालिकेने ६० वर्षांवरील नागरिकांना सोमवार ते बुधवार थेट लसीकरणाची सोय उपलब्ध करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, सोमवारी लसीकरण बंद राहणार असल्याने या आठवड्यात गुरुवारपर्यंत ही सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे

मुंबई : अरबी समुद्रातील ‘तौत्के’ चक्रीवादळच्या इशाऱ्यामुळे सोमवारी मुंबईतील कोविड लसीकरण बंद राहणार आहे; तर ६० वर्षांवरील नागरिकांना गुरुवारपर्यंत थेट (वॉक-इन) लसीकरणाची सोय उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती महानगर पालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी दिली. No Vaccination in Mumbai Today Due to Tautkae Cyclone

हे देखिल पहा-

केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार ‘कोविशिल्ड’ लसीच्या पहिल्या मात्रेनंतर दुसरी मात्रा १२ ते १६ आठवड्यांदरम्यान घ्यायची आहे. त्यामुळे आता १ मार्चपूर्वी ‘कोविशिल्ड’ची लस घेतलेल्या फक्त आरोग्य कर्मचाऱ्यांना आणि पहिल्या फळीतील कर्मचाऱ्यांना ही लस मिळणार आहे. 

रेमडेसिवीरचा काळाबाजार- पाच सदस्यीय समिती करणार चौकशी

गेल्या आठवड्यात पालिकेने ६० वर्षांवरील नागरिकांना सोमवार ते बुधवार थेट लसीकरणाची सोय उपलब्ध करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, सोमवारी लसीकरण बंद राहणार असल्याने या आठवड्यात गुरुवारपर्यंत ही सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. आजवर मुंबईतील सात लाखांहून अधिक नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे; तर सुमारे २१ लाख नागरिकांनी लशीची पहिली मात्रा घेतली आहे. No Vaccination in Mumbai Today Due to Tautkae Cyclone
Edited By - Amit Golwalkar


संबंधित बातम्या

Saam TV Live