भारतात हाताबाहेर जातोय कोरोना? कोणतीही लस 50 टक्केही प्रभावी नाही - WHOचा जगाला इशारा 

साम टीव्ही
रविवार, 6 सप्टेंबर 2020

 

  • भारतात हाताबाहेर जातोय कोरोना ?
  • आठवड्याभरात तब्बल 5 लाख रूग्ण वाढले
  • कोणतीही लस 50 टक्केही प्रभावी नाही
  • WHOचा जगाला इशारा 

भारतात कोरोना रूग्णांची संख्या कमी होण्याचं नाव घेत नाहीये...भारतात कोरोना रूग्णांची संख्या हाताबाहेर जाते की काय ? अशी स्थिती निर्माण झालीय. कोणतीही लस कोरोनावर 50 टक्केही प्रभावी नाही असं सांगत WHOनं त्यामागे काही कारणं सांगितली आहेत. 

भारतात कोरोना रूग्णांची संख्या वाऱ्याच्या वेगानं वाढतीय. अमेरिका आणि ब्राझीलनंतर भारत कोरोना रूग्णांच्या संख्येत तिसऱ्या स्थानी आहे. 
दक्षिण-पूर्व आशियात कोरोना रूग्णसंख्या वाढीचा वेग सर्वाधिक असल्याचं WHOनं म्हंटलंय. अशातच गेल्या आठव़ड्याभरात भारतात तब्बल 5 लाख लोकांना कोरोना संसर्ग झालाय. तज्ज्ञांच्या माहितीनुसार कोरोना आता शहरांपुरता मर्यादित राहिलेला नाही. तर ग्रामीण भागातही वेगानं पसरतोय. लॉकडाऊनमध्ये सूट देण्यात आल्यानं सोशल डिस्टन्सिंगचं पालन झालं नाही. त्याचाही हा परिणाम असल्याचं सांगण्यात येतंय. 

दरम्यान कोरोनावर कोणतीही लस 50 टक्केही प्रभावी नाही असं सांगत  WHO नं धोक्याचा इशारा दिलाय. 

जगभरात करोनाला अटकाव करणाऱ्या अनेक लशी चाचणीच्या महत्त्वाच्या टप्प्यावर आहेत. मात्र, कोणतीही लस पूर्णपणे प्रभावी आहे, असे म्हणता येणार नाही. जागतिक आरोग्य संघटनेचे निकष पूर्णपणे या लशी पूर्ण करत नाहीत. त्यामुळे या लशी प्रभावी आहेत असं म्हणता येणार नाही. पुढील वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यातही व्यापक लशीकरण मोहीम सुरू होईल, असं वाटत नाही 
लस सुरक्षित असल्याच्या खात्रीशिवाय मंजुरी नाही, असंही जागतिक आरोग्य संघटनेनं म्हंटलंय. 

त्यामुळे सर्वांनी पुन्हा एकदा सजग राहण्याची वेळ आलीय. लॉकडाऊन शिथील झाला असला तरी प्रत्येकानं नियम पाळणं आवश्यक आहे. अन्यथा भारतात कोरोनाचा कहर अटळ आहे. 
 


संबंधित बातम्या

Saam TV Live