'कोणतीही लस यशस्वी होण्याची गॅरंटी नाही' - WHO

साम टीव्ही
गुरुवार, 24 सप्टेंबर 2020
  • 'कोणतीही लस यशस्वी होण्याची गॅरंटी नाही'
  • WHOकडून धक्कादायक वक्तव्य
  • जगभरातील 200 लसींवर WHOचं प्रश्नचिन्ह

एक धक्कादायक बातमी. जगभरात कोरोनाच्या तब्बल 200 लसींवर संशोधन सुरूय. मात्र सध्या चाचण्या सुरू असलेल्या कोणत्याही लसीची गॅरंटी आम्ही घेत नसल्याचं वक्तव्य WHO नं केलंय. पाहूयात सविस्तर रिपोर्टमधून -

कोरोनावर मात करण्यासाठी भारतासह जगभरात लसींवर संशोधन सुरू आहे. रशियामध्ये लसी देण्याचं काम सूरू असून अनेक देशांच्या लसीही अंतिम टप्प्यात आहेत. मात्र असं असताना जागतिक आरोग्य संघटनेनं मात्र या लसींवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. जगभरातील कोणतीही लस कोरोनावर अचूक उपचार करू शकेल याची आम्ही गॅरंटी घेत नसल्याचं WHOनं सांगितलंय.

सगळ्या लसी बिनकामाच्या?
कोरोनावर जगभरात सध्या 200 लसींवर संशोधन सुरू आहे. अनेक देशांमध्ये लसींची अंतिम चाचणी सुरू आहे. महत्त्वाचं म्हणजे, रशियामध्ये लसी देण्याचं काम सुरू असून लस शोधल्याचा अमेरिकेनंही दावा केलाय. मात्र, यातली कोणतीही लस कोरोनावर उपचार करेल याची गॅरंटी नसल्याचं WHOनं म्हटलंय.

कोरोनाच्या संकटात संपूर्ण जग अडकलंय. त्यामुळे, प्रत्येकजण लसींचीवाट पाहतोय. अनेक देशांच्या लसी दृष्टीक्षेपात असल्यानं काही प्रमाणात दिलासा मिळतोय, मात्र कोणतीही लस कोरोनावर उपचार करू शकण्याबद्दल खुद्द WHOचं सांशक असल्याने आपण काळजी घेणं इतकंच आपल्या हातात आहे.
 


संबंधित बातम्या

Saam TV Live