पुण्यात आज पाणीपुरवठा बंद

पुण्यात आज पाणीपुरवठा बंद

पुणे: जलवाहिनी पूर्ववत करण्याचे काम पाणीपुरवठा विभागाने युद्धपातळीवर हाती घेतले असले, तरी हे काम पूर्ण होण्यास वेळ लागणार असल्याने आज, शुक्रवारी सकाळी या भागांत पाणीपुरवठा होऊ शकणार नाही. जलवाहिनी पूर्ववत होताच, या भागात कमी दाबाने पाणीपुरवठा करण्यात येईल, असे महापालिकेने स्पष्ट केले आहे.

पावसाच्या पाण्याचा फटका महापालिकेच्या पद्मावती येथील पंपिंग स्टेशनला बसला. येथील पंप आणि मोटारींमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरल्याने तातडीने दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. बिबवेवाडी, कोंढवा रस्ता, गंगाधाम, गुलटेकडी, मार्केट यार्ड, इंदिरानगर, महर्षीनगर, वसंतबाग, पद्मावती, चव्हाणनगर, तळजाई वसाहत, के. के. मार्केट, लेक टाउन, बालाजीनगर, महेश सोसायटी, कोंढवा खुर्द, पोकळेवस्ती या परिसरात पुढील दोन ते तीन दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा केला जाणार आहे.

शहरात बुधवारी झालेल्या जोरदार पावसाचा फटका महापालिकेच्या पाणीपुरवठा यंत्रणेला बसल्याने पद्मावती येथील पंपिंग स्टेशनमध्ये पाणी घुसले आहे. दांडेकर पुलालगतची मुख्य जलवाहिनी वाहून गेल्याने शहराच्या बऱ्याच भागांतील पाणीपुरवठा गुरुवारी विस्कळित झाला. त्यामुळे आज, शुक्रवारी नवी पेठ, राजेंद्रनगर, डेक्कन, पुलाची वाडी, प्रभात रस्ता परिसराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

सहकारनगर, बिबवेवाडी, कोंढवा, मार्केट यार्ड या भागांमध्ये पुढील दोन ते तीन दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. शहर आणि परिसरात बुधवारी रात्री पावसाने थैमान घातले. पुण्याच्या दक्षिण भागांमध्येही अनेक ठिकाणी पाणी घराघरांत शिरले, तर काही ठिकाणी सोसायट्यांच्या तळघरांमध्येही पाणी साठले. पर्वती जलकेंद्रापासून जवळ असणारी आणि त्यापुढील परिसराला पाणीपुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी दांडेकर पुलापाशी वाहून गेल्याने लालबहादूर शास्त्री रस्ता परिसर, लोकमान्य नगर, नवी पेठ परिसर, अलका टॉकीज, पूना हॉस्पिटल, राजेंद्रनगर, वैकुंठ स्मशानभूमी, डेक्कन, पुलाची वाडी, प्रभात रस्ता या भागांत गुरुवारी पाणीपुरवठा होऊ शकला नाही. 

Web Title:: no water supply in pune city today
 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com