हल्लाबोल :: राष्ट्रवादीकडून भाजप सरकारला घेरण्याचे प्रयत्न सुरु

लैलेश बारगजे, साम टीव्ही, औरंगाबाद 
शनिवार, 3 फेब्रुवारी 2018

राष्ट्रवादी काँग्रेसनं राज्यातल्या भाजप सरकारला घेरण्याचे प्रयत्न सुरु केलेयत. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सत्ताधारी उदासीन असल्याचा आरोप करत राष्ट्रवादीनं हल्लाबोल केलाय. शेतकऱ्यांच्या प्रश्नांना थेटपणे हात घालत राष्ट्रवादी काँग्रेसनं राज्यभरात हल्लाबोल यात्रा काढली. त्याचा समारोप औरंगाबादमध्ये झाला. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासह खासदार सुप्रिया सुळे, अजित पवार, सुनील तटकरे, धनंजय मुंडे या नेत्यांनी त्यात सहभाग घेतला. राज्य सरकारनं शेतकऱ्यांना दिलेली कर्जमाफी ही फसवणूक असल्याचा आरोप या नेत्यांनी केला.

राष्ट्रवादी काँग्रेसनं राज्यातल्या भाजप सरकारला घेरण्याचे प्रयत्न सुरु केलेयत. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सत्ताधारी उदासीन असल्याचा आरोप करत राष्ट्रवादीनं हल्लाबोल केलाय. शेतकऱ्यांच्या प्रश्नांना थेटपणे हात घालत राष्ट्रवादी काँग्रेसनं राज्यभरात हल्लाबोल यात्रा काढली. त्याचा समारोप औरंगाबादमध्ये झाला. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासह खासदार सुप्रिया सुळे, अजित पवार, सुनील तटकरे, धनंजय मुंडे या नेत्यांनी त्यात सहभाग घेतला. राज्य सरकारनं शेतकऱ्यांना दिलेली कर्जमाफी ही फसवणूक असल्याचा आरोप या नेत्यांनी केला. राज्यातली शेती उद्ध्वस्त झालीय, त्यामुळेच शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ आली असल्याचा आरोप शरद पवारांनी केलाय. इतकंच नाही तर सरकारच्या घोषणा म्हणजे लबाडाघरचं आवतण असल्याचा दावाही पवारांनी केला. 

अजित पवारांनीही केलं राज्य सरकारला लक्ष्य

अजित पवारांनीही यावेळी राज्य सरकारला लक्ष्य केलं. भाजप सरकारनं राज्यात अघोषित आणीबाणी आणल्याचा आरोपही अजित पवार यांनी केला. सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेनेलाही अजित पवारांनी खडेबोल सुनावले. 

 

धनंजय मुंडेंनी राज्य सरकारवर निशाणा

सोशल मीडियावर घातलेल्या निर्बंधांचा उल्लेख करत धनंजय मुंडेंनी राज्य सरकारवर निशाणा साधला. 

खासदार सुप्रिया सुळे यांनी उचलून धरला मराठी शाळांचा मुद्दा

मराठी शाळांचा मुद्दा खासदार सुप्रिया सुळे यांनी यावेळी उचलून धरला. राज्यातल्या मराठी शाळा बंद करण्याचा राज्य सरकारचा डाव आहे, याकडेही सुप्रिया सुळे यांनी लक्ष वेधलं. या प्रश्नावर पुण्यातल्या लाल महालासमोर उपोषण करणार असल्याचा इरादाही सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला. 

राष्ट्रवादीचा सरकारला घेरण्याचा प्रयत्न

एकूणच, राष्ट्रवादी काँग्रेसनं विविध मुद्द्यांवर राज्य सरकारला घेरण्याचा प्रयत्न केलाय. हल्लाबोल यात्रेच्या निमित्तानं राष्ट्रवादी काँग्रेसनं आपली मोर्चेबांधणीही सुरू केलीय. आता या हल्लाबोल यात्रेचं टायमिंग राष्ट्रवादीच्या घड्याळाला येत्या निवडणुकीत फायदेशीर ठरतं का, याचीच उत्सुकता आहे. 

 


संबंधित बातम्या

Saam TV Live