कांद्याचे सरासरी दर 500 रुपयांनी वधारले; निर्यातमूल्य हटविण्याचा परिणाम  

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 5 फेब्रुवारी 2018

कांद्यावरील किमान निर्यातमूल्य हटविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय केंद्र शासनाने घेतल्यानंतर त्याचे पडसाद बाजारावर उमटले. नाशिक बाजार समितीतील सकाळच्या लिलावातील कांद्याचे सरासरी दर 500 रुपयांनी वधारले. मागील पंधरा दिवसांपासून सुरू असलेल्या कांदा दरातील घसरणीला ‘ब्रेक’ लागणार असून, येत्या काळात लाल आणि उन्हाळ कांद्याचे दर १५०० ते २००० या दरम्यान स्थिर राहतील, असे जाणकारांनी सांगितले. महाराष्ट्रासह मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान या राज्यातून आवक वाढत असताना मार्च अखेरपर्यंत उच्चांकी आवक होण्याचा अंदाज यापूर्वीच तज्ज्ञांनी दिला आहे.

कांद्यावरील किमान निर्यातमूल्य हटविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय केंद्र शासनाने घेतल्यानंतर त्याचे पडसाद बाजारावर उमटले. नाशिक बाजार समितीतील सकाळच्या लिलावातील कांद्याचे सरासरी दर 500 रुपयांनी वधारले. मागील पंधरा दिवसांपासून सुरू असलेल्या कांदा दरातील घसरणीला ‘ब्रेक’ लागणार असून, येत्या काळात लाल आणि उन्हाळ कांद्याचे दर १५०० ते २००० या दरम्यान स्थिर राहतील, असे जाणकारांनी सांगितले. महाराष्ट्रासह मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान या राज्यातून आवक वाढत असताना मार्च अखेरपर्यंत उच्चांकी आवक होण्याचा अंदाज यापूर्वीच तज्ज्ञांनी दिला आहे. येत्या काळात कांद्याचे दर मोठ्या प्रमाणावर घसरण्याची भीती व्यक्त होत होती. मात्र ‘एमईपी'' पूर्णपणे हटविल्यामुळे कांद्याचे दर टिकून राहण्यास मदत होणार आहे. 


संबंधित बातम्या

Saam TV Live