...तर उरलेल्या तुरीचे शेतकऱ्यांनी पकोडे तळायचे का? - राधाकृष्ण विखे-पाटील 

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 6 फेब्रुवारी 2018

शेतकऱ्यांनी पिकवलेली सगळी तूर घेणार नसाल तर उरलेल्या तुरीचे शेतकऱ्यांनी पकोडे तळायचे का? विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांचा संतप्त सवाल...

राज्यातील तूर उत्पादक शेतकऱ्यांना एकरी सरासरी 8 ते 10 क्विंटल उत्पादन झालं असताना सरकार त्यातील मोजकीच तूर खरेदी करणार असेल तर उरलेल्या तुरीचं पीठ करून पकोडे तळायचे का? अशी संतप्त सवाल विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलाय.. तूर खरेदीबाबत एकरी मर्यादा घालणाऱ्या परिपत्रकावरून विखे-पाटील यांनी सरकारवर टीकेची झोड उठवलीय. मुळात शासकीय तूर खरेदीसाठी उशीर झालाय. त्यातच सरकारने शासकीय तूर खरेदीसाठी घातलेली जिल्हानिहाय एकरी मर्यादा शेतकरी विरोधी असून, यासंदर्भातील परिपत्रक तातडीने मागे घेतले पाहिजे. या परिपत्रकानुसार खरेदी झाली तर अनेक जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्याच्या एकूण उत्पादनाच्या एक तृतियांश तूर देखील हमीभावाने खरेदी होणार नाही. काहीही झाले तरी आम्ही सरकारला संपूर्ण तूर खरेदी करायला भाग पाडू. काँग्रेस पक्ष शेतकऱ्यांसह रस्त्यावर उतरून सरकारला सळो की पळो करून सोडेल, असा इशाराही त्यांनी दिलाय. 


संबंधित बातम्या

Saam TV Live