नीरव मोदीच्या संपत्तीवर सीबीआय आणि ईडीची छापेमारी सुरुच

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 21 फेब्रुवारी 2018

पंजाब नॅशनल बँकेला साडे अकरा हजार कोटींचा गंडा घालून देशाबाहेर पसार झालेल्या नीरव मोदीच्या संपत्तीवर सीबीआय आणि ईडीची छापेमारी सुरुच आहे. नीरव मोदीचा रायगड जिल्ह्यातील किहीम येथील आलिशान बंगला आणि दोन कार सीबीआयने सील केल्या आहेत. नीरव मोदी याचा अलिबाग तालुक्यातील किहीम समुद्र किनाऱ्यालगत सुमारे 70 गुंठे जागेमध्ये आलिशान बंगला आहे. नीरव मोदीच्या या बंगल्यामध्ये 13 कर्मचारी काम करत होते. सील केलेल्या या बंगल्याची किंमत ही सुमारे 4 कोटी रुपये असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

संबंधित बातम्या

Saam TV Live