छगन भुजबळांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहीले अन्...

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 24 जून 2018

गुजरातशी पार-तापी-नर्मदा नदीजोड प्रकल्पाबाबत गुजरात सरकार आणि केंद्र शासनाशी कोणताही करार करू नये, अशी मागणी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवलं असून, महाराष्ट्रातील दमणगंगा, नार-पार खोऱ्याच्या पाणलोट क्षेत्रातील पाण्यावर महाराष्ट्राचा हक्क आहे. तो अबाधित ठेवावा.

गुजरातशी पार-तापी-नर्मदा नदीजोड प्रकल्पास महाराष्ट्राची असहमती कळवावी अशी मागणीही त्यांनी केली आहे.
 
संबंधित बातम्या

Saam TV Live