आंबेनळी घाटात बस दरीत कोसळली ; 32 जणांचा मृत्यू

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 28 जुलै 2018

कोकण कृषी विद्यापीठाची मिनी बस पोलादपूर घाटातील दरीत कोसळल्याची अप्रिय घटना घडलीय. यात 32 जणांचा मृत्यू झालाय. पिकनिकसाठी महाबळेश्वरला विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांना घेऊन ही बस निघाली होती. सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास ही बस दरीत कोसली असल्याचं समजलंय.

या घटनेची माहिती मिळताच महाबळेश्वर येथील काही ट्रेकर्सनी घटनास्थळी धाव घेऊन बचावकार्य सुरू केलं. मात्र दरी खोल असल्याने बचावकार्यात मोठ्या अडचणी येत आहेत. पुण्याहून NDRFची टीम घटनास्थळी रवाना झालीये. 

या ठिकाणी बचावकार्य सुरु असल्याने पोलादपूर घाटात वाहतूक थांबविण्यात आली आहे. अपघातातील एका कर्मचाऱ्याने विद्यापीठात फोन करून बसला अपघात झाल्याचं कळवलं. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि स्थानिक आमदारांनी अपघाताची माहिती घेतली. 

WebTitle : marathi news konkan krushi vidyapeet bus accident 

संबंधित बातम्या

Saam TV Live