मोस्ट अवेटेड सॅमसंग गॅलेक्सी 'नोट 9' भारतात लाँच 

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 22 ऑगस्ट 2018

मोबईलच्या जगात सतत नवीन देणाऱ्या सॅमसंगने आपल्या नोट सिरीजमधील 'नोट 9' हा नवा मोबाईल आज (बुधवार) भारतात सादर केला. तीन रंगांमध्ये उपलब्ध असलेल्या या मोबाईलची बॅटरी क्षमता, अॅड्रॉईड ऑपरेटिंग सिस्टीम, एस पेन ब्लूटूथ सपोर्ट आणि डिस्प्ले असे नवे फिचर्स असणार आहेत.

गुडगावमधील एका हॉटेलमध्ये सॅमसंगतर्फे नोट 9 भारतात सादर करण्यात आला. सॅमसंगने आज भारतात मोबाईल सादर केला असला तरी या मोबाईलचे बुकिंग यापूर्वीच सुरु केले होते. भारतात पहिल्यांदाच हा ट्रेंड तयार होत आहे. सॅमसंगने 128 आणि 512 जीबी अशा दोन प्रकारचे क्षमता असलेले मोबाईल बाजारात आणले आहेत. यातील 128 जीबी क्षमता असलेल्या हँडसेटची किंमत सुमारे 67 हजार 900 असून, 512 जीबी क्षमतेच्या हँडसेटची किंमत 85 हजारांपर्यंत आहे.

सॅमसंग गॅलेक्सी 'नोट 9' चे बेस्ट फिचर्स 

- 6.4 इंची डिस्प्ले 
- अॅड्रॉईडची 8.1 ही ऑपरेटिंग 
- 4000 एमएएच  क्षमतेची बॅटरी 
- 128 जीबी मेमरी 6 जीबी रॅम 
- 12 मेगापिक्सल बॅक कॅमेरा
- 8 मेगापिक्सल फ्रन्ट कॅमेरा
- ऑक्टा कोअर प्रोसेसर 

संबंधित बातम्या

Saam TV Live