भाजपने राष्ट्रवादीला दिला जोर का झटका; नवी मुंबईतील बड्या नेत्याला आपल्या जाळ्यात ओढण्यात भाजप यशस्वी 

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 4 सप्टेंबर 2018

नवी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा झटका बसलाय. राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानपरिषद आमदार आणि माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांनी अखेर पक्षाला रामराम ठोकला.

त्यांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला. आता ते भाजपात प्रवेश करणार आहेत.

काही दिवसांपूर्वीच त्यांच्याकडे अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती. तेव्हापासूनच त्यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा होती.

संबंधित बातम्या

Saam TV Live