तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय; विधानसभा मुदतीआधी बरखास्त होणार

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 6 सप्टेंबर 2018

तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी आज (ता. 6) तेलंगणा विधानसभा मुदतीआधी बरखास्त करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. मंत्रिमंडळाने एकमताने हा प्रस्ताव मंजूर केला असून राव हे राज्यपाल ईएसएल नरसिंहम यांची भेट घेऊन त्यांना बरखास्तीच्या निर्णयाची माहिती देतील. 

मुख्यमंत्री राव यांनी आज मंत्रिमंडळ बैठक आयोजित केली होती. यापूर्वीच विधानसभा मुदतीआधी बरखास्त करण्याचा निर्णय होऊ शकतो अशी शक्यता व्यक्त केली जात होती. या बैठकीत राव यांनी मुदतपूर्व विधानसभा बरखास्त करण्याचा निर्णय घेतला व सर्वानुमते तो मंजूर करण्यात आला. 

तेलंगणा राज्यात तेलंगणा राष्ट्र समिती पक्षाचे सरकार आहे. या सरकारचा कार्यकाळ मे 2019 पर्यंत आहे. 2019 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणूकांचा व राष्ट्रीय पातळीवरील राजकारणाचा परिणाम तेलंगणा विधानसभा निवडणुकांवर होऊ शकतो, अशी शक्यता राव यांनी व्यक्त केली. यामुळे मुदतपूर्व विधानसभा बरखास्त करण्याचा निर्णय राव यांनी घेतला आहे.  
 
संबंधित बातम्या

Saam TV Live