पंतप्रधानांना दंड होतो, तेव्हा...

Erna Soleberg
Erna Soleberg

भारतीय पंरपरेनुसार Indian Tradition वयाची साठी ओलांडल्यानंतर षठ्यपूर्ती सोहळा आयोजित केला जातो. नातेवाईक, मित्रमंडळी अशा व्यक्तीला निरोगी दार्घायुष्यासाठी शुभेच्छा देतात. नॉर्वेचे Norwe पंतप्रधानपद दुसऱ्यांदा भूषविणाऱ्या एरेना सोलबर्ग Arena Solberg यांच्या षठ्यपूर्तीनिमित्त गेईलोतील एका रेस्टॉरंटमध्ये २६ फेब्रुवारीला वाढदिवसाच्या पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, गेल्या आठवड्यात कोरोना Corona प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल थेट देशाच्या पंतप्रधानांच २,३५२ डॉलरचा दंड ठोठावण्यात आला. Norwegian PM Arena Solberg fined 2352 dollars for violating Corona Prevention Rules

खरे तर  रेस्टॉरंटमध्ये त्यांच्याकडून तीन स्वतंत्र टेबलवर फक्त १३ जणांसाठी या मेजवानीचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, स्वतः सोलबर्ग या मेजवानीला उपस्थित नव्हत्या. कदाचित त्या निघून गेल्या असतील.

भारतासारख्या India देशात जनतेला कोरोना नियमांचे पालन करण्याचे आवाहन करणाऱ्या राजकीय नेत्यांकडून त्यांचे सर्रास उल्लंघन होते. अशा परिस्थितीत नॉर्वेतील ही घटना त्या देशाची सामाजिक राजकीय, प्रशासकीय व पोलिस खात्यातील मूल्यांबद्दल खूप काही सांगून जाते. सोलबर्ग यांनी कोरोना Corona नियमात बसत असल्याचे समजून रेस्टॉरंटमध्ये कुटुंबीयांसाठी पार्टीचे आयोजन केले होते. पाटीच्या दुसऱ्या दिवशी सोलबर्ग यांच्यासह कुटुंबातील १४ सदस्यांनी भाड्याने घेतलेल्या अपार्टमेंटमध्ये एकत्र येत सुशीचा आस्वाद घेतला. सरकारने कोरोनामुळे १० पेक्षा अधिक जणांनी एकत्रितरित्या कोणताही ‘इव्हेंट’ साजरा करण्यावर बंदी घातली आहे.  Norwegian PM Arena Solberg fined 2352 dollars for violating Corona Prevention Rules

त्यानंतर २३ मार्च रोजी पोलिस Police निरीक्षक पेर मॉर्टेन सेडिंग यांनी रॉयटर्सला याबाबत माहिती दिली. ते म्हणाले कि, आम्ही याप्रकरणी तपास सुरू केला असून पंतप्रधानांचीही चौकशी केली जात आहे. आम्ही पुढाकार घेऊन चौकशी सुरू केली आहे. यावेळी त्यांनी निर्बंधांचे उल्लंघन केल्याबद्दल केल्या जाणाऱ्या दंडाचाही उल्लेख केला.

पोलीसांकडून केली जाणारी चौकशी आणि स्वतःच्याच मंत्रिमंडळातील आरोग्यमंत्र्यांच्या टीकेचा नॉर्वेच्या पंतप्रधानांना सामना करावा लागला. मात्र, सलग दोन दिवस कुटुंबातील दहापेक्षा अधिक जणांना वाढदिवस साजरा करण्यासाठी बोलावल्याबद्दलही त्यांनी माफी मागितली. कोरोनाच्या शारीरिक अंतराच्या नियमाच्या उल्लंघनाचीही त्यांनी प्रांजळपणे कबुली दिली आहे.

यावर बोलत असताना त्या म्हणाल्या कि, मी प्रत्येक दिवशी नॉर्वेच्या लोकांपुढे उभे राहून त्यांना कोरोना संसर्ग रोखण्याचे आवाहन करते. त्यामुळे, मला नियमांची अधिक चांगली माहिती असायला हवी. मात्र, सत्य हे आहे की, मी नियम नीट जाणून घेतले नाहीत. कुटुंबातील दहा जणांपेक्षा अधिक जणांनी एकत्रित येणे हा ‘इव्हेंट’ समजला जाईल, याचीही कल्पना मला आली नाही. Norwegian PM Arena Solberg fined 2352 dollars for violating Corona Prevention Rules

या सर्व घडामोडीनंतर पोलिसप्रमुख Police Chief ओल सवेरूड यांनी ओस्लीतील पत्रकारपरिषदेत पंतप्रधानांना ठोठावलेल्या दंडाची घोषणा केली. मात्र, पंतप्रधान सोलबर्ग यांचे पती सिंड्रे फिन्नस यांना दंड ठोठावण्यात आला नाही. अशा बहुतेक प्रकरणात पोलिस अशा व्यक्तींनाही दंड ठोठावतात. ‘प्रत्येकासाठी नियम सारखा आहे, मात्र, प्रत्येकजण सारखा नाही,’ हे त्यांचे वक्तव्य बरेच काही सांगून जाते. त्याचप्रमाणे, पोलिसांच्या मते पंतप्रधान अशा नियमांचे पालन करण्याच्या सरकारी मोहिमेच्या आघाडीवर असतात. त्यामुळे, कोरोना साथ रोखण्यासाठीच्या नियमांचे पालनातील जनतेच्या मनातील विश्वास कायम ठेवण्यासाठी पंतप्रधानांना दंड ठोठावणे योग्यच आहे.

लेखक पत्रकार असून ‘विओन टीव्ही’चे संपादकीय सल्लागार आहेत. राजकीय व आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक आहेत.
अनुवाद : मयूर जितकर

Edited By- Sanika Gade

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com