कोरोना नाही, तर कोरोनाचे परिणाम जीव घेताय! कोरोनानंतर मृत्यूदरात लक्षणीय वाढ

साम टीव्ही
रविवार, 3 मे 2020
  • मालेगावात एका महिन्यात 700 मृत्यू
  • कोरोनानंतर मृत्यूदरात लक्षणीय वाढ
  • कोरोना नाही तर कोरोनाचे परिणाम जीव घेतायत

  कोरोना जितके जीव घेतोय, त्याहीपेक्षा अधिक जीव हे कोरोनाच्या परिणांमुळे जातायत. मालेगावात तर एका महिन्यात विविध कारणांनी 700 जणांचा मृत्यू झालाय. कोरोनाने किती भयंकर परिणाम केलाय

कोरोनाने मालेगावला विळखा घातला. शहर पुरतं हादरलं...कोरोनाशी लढा सुरु झाला... पण या लढ्यात इतर शत्रूंना डाव साधला. शहरातील मृत्यूदरात लक्षणीय वाढ झाली. आणि एकट्या एप्रिल महिन्यात विविध कारणांनी तब्बल 700 जणांना मृत्यू झाला... 

 मागच्या वर्षी याच महिन्यात मृतांची संख्या 267 इतकी होती. मात्र यावर्षी ती दुपटीहूनही अधिक वाढली... याचं मुख्य कारण म्हणजे कोरोनाशी लढा सुरु असतानाच खासगी दवाखान्यांनी बंद केलेली सेवा यामुळे उपचाराअभावी अनेकांचा मृत्यू झाला.. 

मधुमेह, उच्च रक्तदाब, दमा, ह्रदयविकार असे अन्य आजार असलेल्या  रुग्णांना उपचार मिळण्यात बाधा झाली. 

त्यामुळे कोरोनाशी लढतानाच आता या संकटाशीही लढावं लागणारए. खासगी डॉक्टरांनी भीती सोडून रुग्णसेवेत उतरण्याची गरज आहे... तर आणि तरच या अशा परिणामांना टाळता येऊ शकेल 


संबंधित बातम्या

Saam TV Live