बचतगटांतील महिलांनी तब्बल ६५ कोटी ३४ लाख ६२ हजार ३१२ रुपयांची केली कर्जफेड

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 17 डिसेंबर 2018

नगर - कर्जमाफीचा विषय अजूनही राज्यात संपलेला नाही; मात्र नगर जिल्ह्यामध्ये बचतगटांतील २३ हजार ६१३ महिलांनी एकीच्या बळावर आणि सक्षमपणे व्यवसाय करीत खंबीरपणे तब्बल ६५ कोटी ३४ लाख ६२ हजार ३१२ रुपयांची कर्जफेड केली आहे. विशेष म्हणजे कर्जफेडीची टक्केवारी ९५ आहे. बचतगटांच्या माध्यमातून या महिला गावपातळीवर ग्रामविकासालाही पाठबळ देत आहेत. 

नगर - कर्जमाफीचा विषय अजूनही राज्यात संपलेला नाही; मात्र नगर जिल्ह्यामध्ये बचतगटांतील २३ हजार ६१३ महिलांनी एकीच्या बळावर आणि सक्षमपणे व्यवसाय करीत खंबीरपणे तब्बल ६५ कोटी ३४ लाख ६२ हजार ३१२ रुपयांची कर्जफेड केली आहे. विशेष म्हणजे कर्जफेडीची टक्केवारी ९५ आहे. बचतगटांच्या माध्यमातून या महिला गावपातळीवर ग्रामविकासालाही पाठबळ देत आहेत. 

महिलांच्या सक्षमीकरणासाठी सरकारने महिला बचतगट चळवळ सुरू केली. जिल्ह्यामध्ये महिला आर्थिक विकास महामंडळाने दहा तालुक्‍यांतील २२४ गावांत आतापर्यंत तब्बल तीन हजार ६२ महिला बचतगटांची उभारणी केली. त्यांत अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि दारिद्य्ररेषेखालील महिलांचा समावेश आहे. बचतगटांतून जिल्हाभरातील ३३ हजार १९१ महिला एकत्र आल्या आहेत आणि त्याअंतर्गत बचत सुरू केली. सहा महिने किंवा वर्षभर महिलांना बचतगट सुरळीत सुरू ठेवून अंतर्गत व्यवहार सुरळीत केल्यावर महामंडळाच्या माध्यमातून कर्ज दिले जाते. त्याच अनुषंगाने दोन हजार ४६१ गटांना बॅंकांनी आतापर्यंत ७२ कोटी २६ लाख ४७ हजार ६४७ रुपयांचे कर्ज दिले आहे. २३ हजार ६१३ महिलांनी कर्जाचा लाभ घेतला. 

राज्यात गेल्या दोन वर्षांपासून शेतकरी कर्जमाफीचा विषय चर्चिला जात आहे; मात्र महिला आर्थिक विकास महामंडळाने केलेल्या बचतगटांतील महिलांनी कधी कर्जमाफीचा विचारही केला नाही. मिळालेल्या कर्जातून चांगल्या प्रकारे वेगवेगळे व्यवसाय सुरू केले आहेत. आलेल्या पैशांतून घर-संसार सावरत, नियमित हप्ते भरून आतापर्यंत ६५ कोटी ३४ लाख ६२ हजार ३१२ कोटी रुपये कर्जफेड त्यांनी केली आहे. विशेष म्हणजे, बचतगट सुरू केल्यानंतर वैयक्तिक पातळीवर महिला दर महिन्याला शंभर ते दोनशे रुपयांची बचत सुरू करतात. जिल्ह्यामध्ये ३३ हजार १९१ महिलांनी तब्बल १९ कोटी ३० लाख ८५ हजार ७७२ रुपयांची अशी बचतही केली.

महिला आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणासाठी यशस्वी काम करता आले. शिवाय, या महिला गावाच्या विकासासाठी पुढाकारही घेत आहेत. व्यवसाय करून, घेतलेल्या कर्जाची परतफेड केली, याचे सर्वदूर कौतुक होत आहे.

गावपातळीवर उपक्रम 
गावपातळीवर महिलांनी एकत्र येऊन बचतगट सुरू केल्यानंतर, व्यवसाय करण्यासोबतच गावपातळीवर ग्रामविकासासाठी पुढाकार घेतल्याचे दिसून येत आहे. अनेक गटांच्या माध्यमातून मुलींच्या जन्माचे स्वागत, मुला-मुलींच्या लग्नाला मदत करणे, सार्वजनिक जयंती, वृक्षारोपण, स्वच्छता अभियान यांसारखे उपक्रम त्या राबवितात.

Web Title: Not debt waiver A total of 65 crores of debt has been repaid


संबंधित बातम्या

Saam TV Live