फक्त घोषणाबाजी नाही,  शिवसेना आधी काम करते;  श्रीकांत शिंदे यांचा भाजपला अप्रत्यक्ष टोला

प्रदीप भणगे
गुरुवार, 3 जून 2021

कल्याण-डोंबिवली महापालिका Kalyan-Dombivali Municipal Corporation  घोषित केलेल्या 6500 कोटीचा प्रश्न केला असता त्यांनी नाव न घेता भाजपला टोला हाणला.

वृत्तसंस्था : एमआयडीसी औद्योगिक भागासह निवासी भागातील रस्त्याची दुरवस्था झाली आहे. गेल्या 20 वर्षांपासून निवासी भागातील या रस्त्यांची देखभाल दुरुस्ती न झाल्याने या रस्त्यावर खड्ड्याचे साम्राज्य पसरले आहे. अनेकदा या रस्त्याच्या कामासाठी निधीच्या घोषणा झाल्या अद्यापही रस्त्याचे काम सुरू झालेले नव्हतं. अखेर या रस्त्याच्या कामासाठी 110 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. याबाबत आज खा.डॉ.श्रीकांत शिंदे यांनी पत्रकार परिषद घेत माहिती दिली. (Not just sloganeering, Shiv Sena works first; Shrikant Shinde's indirect attack on BJP) 

स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या स्मरणार्थ डाक पाकिटाचे आज अनावरण

यावेळी कल्याण-डोंबिवली महापालिका Kalyan-Dombivali Municipal Corporation  घोषित केलेल्या 6500 कोटीचा प्रश्न केला असता त्यांनी नाव न घेता भाजपला टोला हाणला. खा.शिंदे यांनी सांगितले की याच्यामध्ये ज्यांनी घोषणा केली त्यांनी याचा विचार केला पाहिजे.आम्ही फक्त घोषणाबाजी करत नाही, शिवसेना Shivsena  पक्ष आधी काम करतो आणि मगच सांगतो. तत्पूर्वी एमआयडीसी औद्योगिक भागासह निवासी भागातील रस्त्याची दुरवस्था झाली आहे. गेल्या 20 वर्षांपासून निवासी भागातील या रस्त्यांची देखभाल दुरुस्ती न झाल्याने या रस्त्यावर खड्ड्याचे साम्राज्य पसरले आहे. अनेकदा या रस्त्याच्या कामासाठी निधीच्या घोषणा झाल्या अद्यापही रस्त्याचे काम सुरू झालेले नव्हतं. अखेर या रस्त्याच्या कामासाठी 110 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. याबाबत आज खा.डॉ.श्रीकांत शिंदे यांनी पत्रकार परिषद घेत माहिती दिली.

तसेच या भागातील रस्ते दुरुस्ती एमआयडीसी करणार की केडीएमसी याबाबत निर्णय होत नव्हता. मात्र आता हा पेच सुटला असून 50% खर्च एमआयडीसी आणि 50% केडीएमसी करणार आहे. प्रत्यक्षात या कामाला सुरुवात होण्यास महिनाभराचा कालावधी लागणार असून या दरम्यान पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर निवासी भागातील या रस्त्यांची डागडुजी केडीएमसी कडून करण्यात येणार असल्याचे खासदार शिंदे यांनी सांगितले. 


संबंधित बातम्या

Saam TV Live