वीज बिल न भरणाऱ्या 80 लाख ग्राहकांना नोटीसा, वीज बिल नाही भरलं तर...

साम टीव्ही
शनिवार, 13 फेब्रुवारी 2021
  • वीज बिल न भरणाऱ्या 80 लाख ग्राहकांना नोटीसा
  • 10 महिन्यांपासून बिल न भरणाऱ्यांची वीज कापणार
  • महावितरणचा वीज ग्राहकांना शॉक

राज्यातील लाखो वीज ग्राहकांना महावितरणनं शॉक दिलाय. गेल्या १० महिन्यात ज्यांनी वीज बिल भरलं नाही अशा ८० लाख ग्राहकांना महावितरणनं वीज कनेक्शन कापण्याची नोटीस बजावलीय.

सुरुवातीला वीज बिल माफी आणि वीज बिल सवलतीची भाषा करणारं सरकार आता वीज बिल भराच अशा निर्वाणीच्या भाषेवर ऊर्जा खातं आलंय. महावितरणनं राज्यातल्या 80 लाख 32 हजार वीज ग्राहकांना वीज बिल भरा नाहीतर कनेक्शन कापण्याच्या नोटीसा बजावल्यात.

कृषीपंप धारकांकडं 45 हजार 500 कोटी रुपयांची थकबाकी आहे. तर घरगुती आणि औद्योगिक ग्राहकांकडं 8 हजार 485 हजार कोटी रुपये तर उच्चदाब ग्राहकांकडं 2 हजार 435 कोटी रुपयांची थकबाकी आहे.

महावितरणनं थेट वीज कनेक्शन कापण्याची धमकी दिल्यानं ग्राहक हवालदिल झालेत.

महावितरणच्या या भूमिकेमुळं राजकीय पक्षही आक्रमक झालेत. महावितरणनं वीज कापल्यास रयत क्रांती संघटना तोडलेलं वीज कनेक्शन जोडण्याचं आंदोलन करेल अशी घोषणा माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केलीय.

कोरोना काळात अव्वाच्या सव्वा वीज बिलं आलीयेत हे वास्तव आहे. महावितरण वीज बिल तपासून घेण्याचं आवाहन करत असलं तरी वीज कार्यालयात प्रचंड गोंधळ आहे. त्यामुळं लाखो वीज ग्राहकांना अंधारात राहावं लागेल.


संबंधित बातम्या

Saam TV Live