1 नोव्हेंबरपासून बँक, एलपीजी गॅस आणि रेल्वेचे हे नियम बदलले, पाहा कसे असतील हे नवे नियम

साम टीव्ही
रविवार, 1 नोव्हेंबर 2020

आज 1 नोव्हेंबर आहे, आणि गॅसपासून ते बँक व्यवहारांपर्यंत अनेक नियमांत आजपासून बदल झालेत. हे नियम नेमके कोणकोणते आहेत ते पाहुयात - 

आज 1 नोव्हेंबर आहे, आणि गॅसपासून ते बँक व्यवहारांपर्यंत अनेक नियमांत आजपासून बदल झालेत. हे नियम नेमके कोणकोणते आहेत ते पाहुयात - 

1) एलपीजी सिलिंडरच्या वितरण नियमात बदल-

LPGसाठी डीएसी प्रणाली लागू, गॅस सिलिंडर घेण्यासाठी OTP लागणार

2) इंडेन गॅसनं बुकिंगचा नंबर बदलला
इंडेनच्या ग्राहकांना जुन्या क्रमांकावर गॅस बुक करता येणार नाही, एलपीजी सिलिंडर बुक करण्यासाठी 
७७१८९५५५५५ वर कॉल/ एसएमएस पाठवावा लागेल

3) गॅस सिलिंडरच्या किंमती बदल
राज्यातील तेल कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या तारखेला LPG सिलिंडरच्या किंमती ठरवतात, त्यानुसार 1 नोव्हेंबरला सिलिंडरच्या किंमती बदलण्याची शक्यता आहे

४) रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकात बदल

  • १ नोव्हेंबरपासून देशभरातील गाड्यांचे वेळापत्रक बदलणार, 13 हजार प्रवासी, 7 हजार मालवाहतूक गाड्यांच्या वेळेत बदल
  • तेजस एक्स्प्रेस चंदिगड ते नवी दिल्ली दरम्यान धावेल
  • 1 नोव्हेंबरपासून दर बुधवारी सुटेल.

५) SBI बचत खात्यावर कमी व्याज मिळणार
बचत खात्यावर 1 लाख रुपयांपर्यंत व्याजदर ०.२५%कमी करून ३.२५ टक्के, 
१ लाखाहून अधिक रकमेच्या ठेवींवर रेपो रेटनुसार व्याज

१ नोव्हेंबरपासून एसबीआयचे काही महत्त्वपूर्ण नियम बदलणार आहेत. एसबीआय बचत खात्यांवर कमी व्याज मिळेल. आता १ नोव्हेंबरपासून बचत खात्यावर १ लाख रुपयांपर्यंत ०.२५ टक्के व्याजदर कमी करून ३.२५ टक्के केले जाईल. तर १ लाखाहून अधिक रकमेच्या ठेवींवर आता रेपो रेटनुसार व्याज मिळेल.


संबंधित बातम्या

Saam TV Live