17 नोव्हेंबरला तृप्ती देसाई जाणार शबरीमलाला

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 14 नोव्हेंबर 2018

नवी दिल्ली : शबरीमला मंदिरात महिलांच्या प्रवेशावरून गेल्या काही दिवसांपासून वाद सुरु आहे. त्यानंतर आता भूमाता ब्रिगेडच्या संस्थापक अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी 17 नोव्हेंबरला मंदिरात जाण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत त्यांनी केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन यांना पत्र लिहिले असून, या पत्रात त्यांनी सुरक्षेची मागणीही केली. 

शबरीमला मंदिरात महिलांना प्रवेश देण्यात यावा, याबाबतचे मत सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केले. मात्र, न्यायालयाच्या या भुमिकेनंतरही महिलांना शबरीमला मंदिरात प्रवेशाबाबत मज्जाव केला जात आहे. याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात एक पुनर्विचार याचिकाही दाखल करण्यात आली. 5 नोव्हेंबरला दर्शनासाठी हे मंदिर उघडण्यात आले होते. त्यानंतर 6 नोव्हेंबरला या ठिकाणी पुन्हा एकदा हिंसाचार घडला होता. 

दरम्यान, मागील महिन्यात झालेला वाद आणि या महिन्यात घडलेला हिंसाचार या सर्व बाबींच्या पार्श्वभूमीवर तृप्ती देसाईंनी सुरक्षेची मागणी करणारे पत्र मुख्यमंत्री पी. विजयन यांना लिहिले आहे. 

Web Title: On November 17 Trupti Desai will go to Shabarimala temple

संबंधित बातम्या

Saam TV Live