फास्टॅगवर आता भरा पेट्रोल, डिझेल आणि साएनजी

साम टीव्ही
शुक्रवार, 5 मार्च 2021

टोलसाठी फास्टॅग सक्ती करण्यात आलीय. पण येत्या काळात वाहनासाठी फास्टॅगच सबकुछ असणार आहे. फास्टॅगद्वारे तुम्हाला पेट्रोल आणि डिझेल भरता येणार आहे.

टोलसाठी फास्टॅग सक्ती करण्यात आलीय. पण येत्या काळात वाहनासाठी फास्टॅगच सबकुछ असणार आहे. फास्टॅगद्वारे तुम्हाला पेट्रोल आणि डिझेल भरता येणार आहे. शिवाय पार्किंग फी पण फास्टॅगच्या माध्यमातूनच देण्य़ाची सुविधा उपलब्ध होणार आहे. 

टोलवसुलीसाठी आता प्रत्येक टोल नाक्यावर फास्टॅग सक्ती करण्यात आलीय. फास्टॅगमुळं वाहनचालकांची फक्त टोलच्या रांगेतून मुक्ती होणार असं नाही फास्टॅगचे इतरही अनेक फायदे होणार आहेत. फास्टॅगच्या आधारे तुम्हाला पेट्रोल, डिझेल भरता येणार आहे. शिवाय वाहनात सीएनजी रिफिलिंगही करता येणार आहे. बंगळुरू विमानतळावर पार्किंग चार्जेसही फास्टॅगवर वसूल केले जाणार आहेत.  येत्या काळात अनेक सेवा फास्टॅगवर वळवण्याचा विचार आहे. त्यामुळं वाहनधारकाला फास्टॅग रिचार्ज केल्यावर खिशात रोख रक्कम बाळगण्याची गरज राहणार नाही.

 फास्टॅग फक्त टोलपुरता मर्यादित राहाणार नाही. यापुढं फास्टॅग वॉलेटची सगळी कामं करणार आहे. त्यामुळं फास्टॅग हा तुमचा डिजिटल पाकीट होणार असल्याचं तज्ज्ञ सांगतात.

 


फोटो

संबंधित बातम्या

Saam TV Live