VIDEO| आता क्रेडिट आणि डेबिट कार्डला हवं तेव्हा करा लॉक

VIDEO| आता क्रेडिट आणि डेबिट कार्डला हवं तेव्हा करा लॉक

क्रेडिट आणि डेबिट कार्ड तुमच्या आमच्या जिवनाचा अविभाज्य भाग बनलंय. पण बऱ्याचदा कार्ड हरवल्यास किंवा एखादी अडचण आल्यास आपल्याला आपलं कार्ड लॉक करावं लागतं. तसच एखादी सुविधा हवी असल्यास किंवा नको असल्यास कस्टमर केअरला सूचना द्यावी लागते. पण आता या सगळ्या कटकटीतून तुमची लवकरच सुटका होणारंय. क्रेडिट आणि डेबिट कार्ड पाहिजे तेव्हा बंद करण्याची सुविधा लवकरात लवकरात उपलब्ध करून द्या, अशा सूचना रिझर्व्ह बँकेनं सर्व कार्ड बनवणाऱ्या कंपन्या आणि बँकांना दिल्या आहेत. ऑनलाईन व्यवहारांमुळे ग्राहकांना सातत्यानं कार्डचा वापर करावा लागतो. त्यात माहिती लीक होऊन ग्राहकांचे पैसे जाण्याचे प्रकारही वाढलेत. हाच धोका लक्षात घेऊन रिझर्व्ह बँकेनं हे निर्देश दिले आहेत. 

रिझर्व्ह बँकेनं सूचवलेल्या या पर्यायामुळे आपलं डेबिट - क्रेडिट कार्ड सुरू वा बंद करण्याचा निर्णय तुम्ही स्वत:च घेऊ शकाल. याशिवाय कोणत्याही पद्धतीची खरेदी किंवा सेवा सुरू अथवा बंद करण्याचं स्वातंत्र्यही ग्राहकांना देण्याचे निर्देश देण्यात आलेत.. सध्या सेवांमध्ये इंटरनेट बँकिंग, एटीएमचा वापर, ऑनलाईन खरेदी आणि पॉईंट ऑफ सेलमध्ये कार्ड स्वाइप करणं इत्यादींचा समावेश आहे. जर तुम्ही खरेदीसाठी ऑनलाईन शॉपिंगचा वापर करत नसाल तर तुम्ही ही सेवा स्वत:च बंद करू शकाल. त्यामुळे येत्या काळात क्रेडिट आणि डेबिट कार्डच्या वापराबाबत तुम्हाला पूर्णपणे स्वातंत्र्य मिळालेलं असेल. 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com