7/12वर आता कारभारणीचं नाव

SAAM TV
शनिवार, 27 फेब्रुवारी 2021

घरातल्या कर्त्या पुरुषासोबत आता महिलेचंही नाव सातबारावर असणार आहे. महिलादिनापासून सातबाराच्या उताऱ्यावर नाव लावलं जाणार आहे. हा निर्णय क्रांतीकारी मानला जातोय.

 

आतापर्यंत जमिनीवर एकट्या जमीन मालकाचंच नाव असायचं. त्याच्या मृत्यूनंतर पत्नी आणि मुलांची नावं सातबारावर येत होती. अनेक प्रकरणात जमीन विकताना महिलांचा विचारच केला जात नव्हता. पण आता सरकारनं नवा कायदा केलाय. त्यानुसार सातबाऱ्यावर घरातल्या कर्त्या पुरुषासोबत त्याच्या बायकोचंही नाव लागणार आहे. महिलादिनापासून म्हणजेच ८ मार्चपासून त्याची अंमलबजावणी होणार आहे.

मालमत्तेच्या मालकीबाबत कारभारणीला दुय्यम स्थान होतं. पण आता पुरुषासोबत महिलेचंही नाव सातबारावर आल्यानं महिलांना बरोबरीचं स्थान मिळालंय.

पुरोगामी महाराष्ट्रात स्त्री पुरुष समानेसाठी अनेक धाडसी निर्णय घेण्यात आलेत. सातबाऱ्यावर कारभारणीचं नाव चढवून सरकारनं आणखी एक स्वागतार्ह निर्णय घेतला असं म्हणावं लागेल.

अाता  महिलांसाठी एक चांगली बातमी .यापुढे जमीनीच्या 7/12 उतारयावर, सिटी सर्व्हेच्या उतारयावर पतीबरोबर पत्नीचेही नाव लावण्यात येणार अाहे. याबाबत राज्याच्या ग्रामविकास विभागाने निर्णय घेतला असून त्याची अमंलबजावणी येत्या महिला दिनापासून होणार अाहे.

गावगाडा चालवत असताना महिलांना स्थान अगदी नगण्य असायचं..कुटूंबाची सर्व संपत्ती पुरुषांच्या नावेच असायची.क्वचित एखाद्या घरात महिलेच्या नावावर सात बार उतारा निघायचा.अाता मात्र ही परिस्थिती बदलणार अाहे. घर चालवणारया कारभारणीचं नावंही अाता 7/12 अाणि सिटी सर्व्हेच्या उतारयावर येणार अाहे. याबाबत निर्णय ग्रामविकास विभागाने घेतला अाहे. त्याची अमंलबजावणी अाता महिला दिनापासून सुरु होणार अाहे. तीन महिने ही मोहिम चालेल

या निर्णयाचं स्वागत महिलांच्यामधून होत अाहे. कारण यामुळं ग्रामीण भागातील महिला सक्षमीकरणास मदत होणार अाहे.

ग्रामविकास खात्याने घेतलेल्या या निर्णयामुळे घरात अाणि गावातही स्त्रीयांना योग्य स्थान मिळण्यास मदत होईल.

 


संबंधित बातम्या

Saam TV Live