VEDIO | आता तुमचा आवाज सांगेल तुम्हाला कोरोना झाला की नाही...

साम टीव्ही
रविवार, 9 ऑगस्ट 2020
  • आता ध्वनिलहरींवरून होणार कोरोनाचं निदान
  • तुमचा आवाजच सांगणार कोरोना आहे की नाही
  • मुंबई महापालिकेकडून नव्या प्रयोगाची तयारी

आता तुमचा आवाजच सांगणार आहे तुम्हाला कोरोना आहे की नाही. हो आम्ही खरं बोलतोय. ध्वनी लहरींवरून कोरोनाचं निदान करण्याचा प्रयोग मुंबई महापालिकेनं सुरू केलाय. काय आहे हा प्रयोग, पाहूयात सविस्तर रिपोर्टमधून.

अँटिजेन, अँटिबॉडीच्या तपासणीवरून कोरोनाचं निदान सुरू असतानाच आता तुमचा आवाजच तुम्हाला कोरोना आहे की नाही हे सागणारय. कारण, मुंबई महापालिकेने ध्वनिलहरीवरून कोरोनाचं निदान करण्याचा प्रयोग सुरू केलाय. 

कोरोनाची लक्षणे दिसू लागतात तेव्हा श्वास घेण्यास त्रास सुरू होतो. त्यामुळे  फुप्फुसाच्या स्नायूंवर ताण येऊन सूज येते. त्यानंतर रुग्णाच्या आवाज मोठा बदल होतो. याच बदललेल्या आवाजाची मोजणी करून कोरोनाचं निदान करता येतं.  रुग्णाचा व्हीबी 0.5 च्या खाली असेल तर ती व्यक्ती कोविड निगेटिव्ह मानली जाईल. मात्र, जर त्यापेक्षा व्हीबी जास्त आला तर त्या व्यक्तीला कोविड 19 चा संशयित म्हणून पुढील तपासणी करावी लागेल. महत्त्वाचं म्हणजे या तपासणीतून कोरोनाचं निदान अवघ्या 30 सेकंदात होणारेय.
याप्रकारच्या तापासण्या अमेरिका आणि इस्त्राईलमध्ये सुरू आहेत. त्याच धर्तीवर मुंबई महापालिकेने गोरेगावच्या जंबो केअर सेंटरमध्ये हा प्रयोग सुरू केलाय. प्रयोगासाठी 1000 रुग्णांच्या आवाजाची तपासणी केली जाणार आहे. या प्रयोगासाठी दोन ते तीन महिने लागण्याची शक्यता आहे, त्यामुळे, हा प्रयोग यशस्वी झाल्यास कोरोनाचं निदान अवघ्या 30 सेकंदात होणारेय.


संबंधित बातम्या

Saam TV Live