अमित शहा हरवलेत? एनएसयूआयची पोलिसांत तक्रार

Amit Shah
Amit Shah

नवी दिल्ली : देश कोरोनाशी लढत असताना देशाचे गृहमंत्री अमित शहा Amit Shah कुठे आहेत, असा सवाल करत नॅशनल स्टुडंट्स युनियन आॅफ इंडिया (एनएसयूआय)NSUI  या काँग्रेस Congress प्रणित संघटनेने दिल्ली पोलिसांमध्ये 'मिसिंग' ची तक्रार दिली आहे. या वृत्ताबाबत #AmitShahMissing या हॅशटॅगने ट्वीटरवर उलटसुलट प्रतिक्रियांचा धुमाकूळ सुरु आहे. NSUI Files missing complaint against Amit Shah with Delhi police

देशात दिवसभरात साडेतीन लाखांहून अधिक नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर गेल्या चोवीस तासांत ४१२० मृत्यू झाले आहेत. त्या पार्श्वभूमीवर एनएसयूआयने गृहमंत्री गायब झाल्याची तक्रार देत सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. बुधवारी या तक्रारीनंतर दिल्ली पोलिसांनी Delhi Police एनएसयूआयच्या कार्यालयाला भेट देऊन याबाबत माहिती घेतली. एनएसयूआयचे राष्ट्रीय सरचिटणीस नागेश करिअप्पा यांनी ही तक्रार दिली आहे.

हे देखिल पहा - 

दिल्लीच्या पार्लमेंट पोलिस ठाण्यात ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. देश संकटात असताना राजकीय नेतृत्त्वाने पळ न काढता संकटातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करत देशवासियांना धीर द्यायला हवा, असे या तक्रारीत म्हटले आहे. अमित शहा हे शेवटचे पश्चिम बंगालच्या निवडणुकांदरम्यान दिसले होते, असेही या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. NSUI Files missing complaint against Amit Shah with Delhi police

२०१३ पर्यंत राजकीय नेतृत्त्व समाजाशी असलेले आपले उत्तरदायित्व मानणारे होते. पण २०१४ नंतर भाजप देशात सत्तेवर आल्यानंतर हे चित्र बदलले असून सरकारमधील दुसऱ्या क्रमांकाची महत्त्वाची व्यक्तीच या कोरोना महामारीच्या काळात 'गायब' आहे, असे एनएसयूआयच्या प्रसिद्धी विभागाचे प्रमुख लोकेश चुग यांनी म्हटले आहे.
Edited By - Amit Golwalkar

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com