कंटेनमेंट झोनची संख्या होणार कमी 

 कंटेनमेंट झोनची संख्या होणार कमी 


मुंबई: करोना पॉझिटिव्ह रुग्णांना चौदा दिवस अलगीकरण कक्षात ठेवण्यात येते. हे दिवस कमी करून ते सात दिवसांवर आणण्याचा पालिका प्रशासनाचा विचार आहे. सध्या पॉझिटिव्ह रुग्णाला सात दिवसांपासून दहा दिवसापर्यंत ताप व अन्य लक्षणे आढळून आली नाही तर घरी पाठवण्यात येते. घरी गेल्यावर किमान सात दिवस घराबाहेर न पडण्याचे बंधन घालण्यात आले आहे.


करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन खाटांची संख्या वाढवण्यात येत असून अलगीकरण कक्षाची संख्याही वाढवण्यावर भर देण्यात आला आहे. व्हेंटिलेटरसह आयसीयूमधील खाटांची संख्या येणाऱ्या काळात वाढवण्यात येणार असल्याचे आयुक्तांनी यावेळी सांगितले. पालिका प्रशासन करत असलेल्या उपायोजनांची आपल्याला वेळोवेळी माहिती देण्यात येईल, आपल्या सहकार्याची अपेक्षा आहे, असे विनंती आयुक्तांनी केल्याचे विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी सांगितले.


एखाद्या परिसरात करोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडला की तो भाग प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर केला जातो. त्यामुळे या भागात पोलिस बंदोबस्त तसेच पालिकेची आरोग्य व प्रशासकीय यंत्रणा सज्ज ठेवावी लागते. यासाठी मोठे मनुष्यबळ लागते. यावर उपाय म्हणून एक-दोन रुग्ण आढळलेला भाग कंटेनमेंट झोन घोषित न करता त्या रुग्णाला तातडीने पालिकेच्या अलगीकरण कक्षात हलवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी गुरुवारी पालिकेतील सर्वपक्षीय गटनेते, विविध समित्यांचे अध्यक्ष यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. यावेळी आयुक्तांनी मुंबई कंटेनमेंट झोनची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याकडे लक्ष वेधले. ही संख्या कमी करण्यासाठी पालिका प्रशासन प्रयत्नशील आहे. सध्या एका इमारतीत एक रुग्ण सापडला तरी तो भाग कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात येतो. यापुढे तसे न करता त्या रुग्णाला तातडीने पालिकेच्या अलगीकरण कक्षात हलवले जाणार असून त्यामुळे कंटेनमेंट झोन झाल्यानंतर लागणारे पोलिस बळ कमी तसेच पालिकेची यंत्रणा कमी प्रमाणात लागून मनुष्यबळाचा वापर कमी होईल. हे मनुष्यबळ जेथे आवश्यकता असेल तेथे वापरण्यात येईल, असे आयुक्तांनी या संवादात स्पष्ट केले.

WebTittle ::  The number of containment zones will be reduced

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com