70 हजारांच्यावर कोरोनाबाधितांची संख्या  

साम टीव्ही न्यूज
मंगळवार, 12 मे 2020

ओडिशात गेल्या २४ तासांमध्ये ३७ नवे रुग्ण आढळले असून रुग्णांची एकूण संख्या ४१४ वर पोहोचली आहे. तर आसाममध्ये २ नवे रुग्ण आढळले आहेत. राज्यात एकूण रुग्ण ६४ आहेत. आंध्र प्रदेशात गेल्या २४ तासांमध्ये ३८ नवे रुग्ण आढळले. राज्यात एकूण रुग्णांची संख्या आहे २०००. राज्यात एकूण ४५ मृत्यू झाले आहेत. राजस्थानात गेल्या २४ तासांत ५ रुग्णांचे मृत्यू झाले आहेत. तर आणखी १७४ नवे रुग्ण आढळले आहेत. ५ मृतांपैकी दोघांचा जयपूर, दोघांचा पोली आण एकाचा अजमेर येथे मृत्यू झाला. राज्यात एकूण मृत्यू ११३ इतके झाले असून एकूण रुग्णांची संख्या पोहोचली आहेत ३,९८८.

नवी दिल्ली:  गेल्या २४ तासांमध्ये राज्यात ७९८ नव्या रुग्णांची भर पडली आहे. ही दिवसभरातील राज्यातील सर्वाधिक आहे. गुजरातमध्ये सोमवारी ३४७, दिल्लीत ३१० रुग्ण आढळले. ही संख्या आतापर्यंत आढळलेल्या रुग्णसंख्येहून जास्त आहे. देशातील करोनाबाधित रुग्णांच्या संख्येने ६० हजारांची संख्या गाठल्यानंतर आज दोनच दिवसांनी ही संख्या ७० हजारांवर जाऊन पोहोचली आहे. देशात सर्वाधिक रुग्णसंख्या असलेल्या महाराष्ट्रातही गेल्या सहा दिवसांपासून रुग्णसंख्या दररोज १ हजाराहून अधिक वाढत आहे. तामिळनाडूतही करोनाचे रुग्ण झापाट्याने वाढत असून

ओडिशात गेल्या २४ तासांमध्ये ३७ नवे रुग्ण आढळले असून रुग्णांची एकूण संख्या ४१४ वर पोहोचली आहे. तर आसाममध्ये २ नवे रुग्ण आढळले आहेत. राज्यात एकूण रुग्ण ६४ आहेत. आंध्र प्रदेशात गेल्या २४ तासांमध्ये ३८ नवे रुग्ण आढळले. राज्यात एकूण रुग्णांची संख्या आहे २०००. राज्यात एकूण ४५ मृत्यू झाले आहेत. राजस्थानात गेल्या २४ तासांत ५ रुग्णांचे मृत्यू झाले आहेत. तर आणखी १७४ नवे रुग्ण आढळले आहेत. ५ मृतांपैकी दोघांचा जयपूर, दोघांचा पोली आण एकाचा अजमेर येथे मृत्यू झाला. राज्यात एकूण मृत्यू ११३ इतके झाले असून एकूण रुग्णांची संख्या पोहोचली आहेत ३,९८८.

मुंबईत रविवारी १,२७६ नव्या रुग्णांची नोंद झाली. मात्र सोमवारी यात किंचितशी घट झाली. सोमवारी नव्या रुग्णांची संख्या होती १२३०. तर तामिळनाडूत एकूण रुग्णसंख्या आहे ८,००२. मात्र, एकूणच, देशभरात नव्या करोना रुग्णांची संख्या रविवारी ४,३०८ इतकी नोंदवली गेली. त्यात सोमवारी घट होत ती ३,६०७ वर आली. राज्यांद्वारे नोंदविलेल्या ताज्या आकडेवारीनुसार भारतात आता ७०,७९३ इतके रुग्ण आहेत. महाराष्ट्रात एकूण रुग्णांपैकी जवळजवळ एक तृतीयांश रुग्ण आहेत. महाराष्ट्र, गुजरात, तामिळनाडू आणि दिल्ली या चार राज्यांत भारतातील करोना रुग्णांपैकी ६६ टक्के रुग्ण आहेत.बिहार राज्यात ५३ नवे रुग्ण आढळले असून राज्यात करोनाबाधितांची संख्या पोहोचली आहे ७४९ वर. राज्यात एकूण ६ मृत्यू झाले असून ३६७ रुग्ण बरे झाले आहेत.
 
देशातील ११३ वर असलेला मृत्यूदर सोमवारी ८२ वर घसरला होता ही त्यातल्यात्यात समाधानाची बाब. महाराष्ट्रात सर्वाधिकक ८६८ मृत्यू झाले, तर एकट्या मुंबईत ५२८ मृत्यू झाले. गुजरातध्ये २० रुग्णांचा मृत्यू झाला. गेल्या २४ तासांमध्ये राज्यात ३४७ नवे रुग्ण आढळले.दिल्लीत २४ तासांमध्ये एकही मृत्यू झालेला नाही. मात्र, गेल्या २४ तासांमध्ये या राज्यात ३४७ नवे रुग्ण आढळले.

WebTittle : The number of coronadoids over 70 thousand

संबंधित बातम्या

Saam TV Live